Homeताज्या बातम्या

सोशल मीडियाच्या युगात पुरस्कारदात्यांनी प्रस्ताव मागविणे बंद करावेमुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांचे पुरस्कारदात्यांना आवाहन

बीड  : काही वर्षांपूर्वी आणि आताच्या परिस्थितीमध्ये खूप मोठा फरक पडला आहे. पूर्वी लोकांकडे वेळच वेळ असायचा आता मात्र प्रत्येकाला वेळेची अत्यंत कम

पुणे प्रादेशिक विभागात कृषिपंप ग्राहकांकडे 12 हजार कोटीचे थकले वीजबिल
सेल्फ बॅलेन्सिंग स्कूटर !
सातार्‍यात सापडली गुप्त होणारी मानवी कवटी; जिल्हा रुग्णालयातील अधिकार्‍यांना डोकेदुखी


बीड  : काही वर्षांपूर्वी आणि आताच्या परिस्थितीमध्ये खूप मोठा फरक पडला आहे. पूर्वी लोकांकडे वेळच वेळ असायचा आता मात्र प्रत्येकाला वेळेची अत्यंत कमतरता वाटू लागली आहे. म्हणून सोशल मीडियाच्या या युगात पुरस्कारदात्यांनी प्रस्ताव मागविणे बंद करावे. असे आवाहन मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी पुरस्कारदात्यांसाठी केले आहे.
               याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केलेले आहेत की, समाजात चांगले कार्य करणार्‍या व्यक्तींना अनेक संस्था, संघटना, विविध पुरस्कारांनी सन्मानित करतात. याकरिता पूर्वापार चालत आलेली एक पद्धत म्हणजे पुरस्कारार्थींकडून प्रस्ताव मागविणे होय. सध्याही हीच सरधोपट पद्धत सुरू आहे. सोशल मीडिया अगोदर अशा प्रकारे प्रस्ताव मागविले जायचे. तेव्हा प्रिंट मीडिया शिवाय कुणाचेही कार्य समाजासमोर येत नसे. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. सोशल मीडियामुळे प्रत्येकाचे चांगले किंवा वाईट कार्य चुटकीसरशी व्हायरल होत आहे. चांगले कार्य करणार्‍यांचे चांगले काम सुद्धा तेवढ्याच जलद गतीने समाजासमोर येऊ लागले आहेत. याशिवाय आताच्या मानाने पूर्वीच्या लोकांकडे प्रस्ताव तयार करण्याकरिता भरपूर वेळ असायचा. शिवाय प्रस्तावासाठी लागणारी सामग्री नाममात्र दरात जमा करता यायची. आता मात्र काळ बदलला आहे. आता लोकांकडे प्रस्ताव तयार करण्यासाठी एक तर वेळ नाही. शिवाय प्रस्ताव पाठविण्यासाठी जमा करावयाच्या सामग्रीसाठी लागणार्‍या खर्चाचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे चांगले कार्य करणारा प्रत्येक व्यक्ती तो करू शकतो असेही नसते. प्रत्येक क्षेत्रातील चांगले कार्य करणार्‍या व्यक्तींना प्रस्ताव पाठविण्याकरिता लागणारा वेळ आणि खर्च करता येईल असे पुरस्कारदात्यांनी समजू नये. विशेष करून समाजसेवा आणि पत्रकारिता या दोन क्षेत्रात स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून तळमळीने कार्य करणारे आर्थिक दृष्ट्या सदैव कफल्लकच राहतात. मात्र त्यांचे कार्य हे पैशांच्या श्रीमंतीपेक्षा कितीतरी मोलाचे असतात. या सर्व बाबी लक्षात घेता सोशल मीडियाच्या या युगात पुरस्कारदात्यांनी आता प्रस्ताव मागविणे बंद करावे. त्यांनी चांगले काम करणार्‍यांची जातीने माहिती घ्यावी. प्रस्ताव न मागविता फक्त एक अर्ज घेऊन पुरस्कारार्थींना पुरस्कार देऊन सन्मानित करावे. असे आवाहन मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी केले आहे.

COMMENTS