बीड : भारतीय दूरचित्रवाणीवरील सर्वाधिक लोकप्रिय आणि प्रदीर्घ काळ चालणार्या विनोदी मालिकांपैकी एक असलेल्या तारक मेहता का उल्टा चष्मा’ने 28 जुलै र

बीड : भारतीय दूरचित्रवाणीवरील सर्वाधिक लोकप्रिय आणि प्रदीर्घ काळ चालणार्या विनोदी मालिकांपैकी एक असलेल्या तारक मेहता का उल्टा चष्मा’ने 28 जुलै रोजी यशस्वी 18 वर्षांचा टप्पा पूर्ण केला. या निमित्ताने सोनी सब आणि नीला फिल्म प्रोडक्शन्स यांनी 18 दिवसांच्या विशेष उत्सवाची घोषणा केली असून, चाहत्यांसाठी विविध आकर्षक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या विशेष उत्सवात देशव्यापी ढचघजउ फॅमिली कॉन्टेस्ट, 18 कुटुंबांसाठी सर्व खर्च समाविष्ट असलेला (ऑल-एक्स्पेन्स-पेड) खास अनुभव, विशेष स्मरणिका (स्पेशल एडिशन) मर्चेंडाइज आणि नव्या रूपातील गोकुळधाम सोसायटीचे दर्शन घडविण्यात येणार आहे. तसेच 28 जुलै रोजी वाढदिवस असलेल्या 40 चाहत्यांचा विशेष सत्कारही करण्यात येणार आहे. असित कुमार मोदी यांच्या नीला फिल्म प्रोडक्शन्सच्या निर्मितीखाली आणि सोनी सबवर प्रसारित होणार्या या मालिकेने गेल्या 18 वर्षांत स्वच्छ विनोद, कौटुंबिक मूल्ये आणि सामाजिक संदेश यांचा सुरेख संगम घडवत प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. पर्यावरण संरक्षण, डिजिटल सुरक्षा, सामाजिक सलोखा आणि नागरिकांची जबाबदारी यांसारख्या विषयांवरही मालिकेने प्रभावी जनजागृती केली आहे. सोनी सबचे चीफ कंटेंट ऑफिसर अजय भालवणकर यांनी सांगितले की, या मालिकेने लाखो कुटुंबांना एकत्र आणत आनंद आणि सकारात्मकतेचा संदेश दिला आहे. तर नीला फिल्म प्रोडक्शन्सचे संस्थापक असित कुमार मोदी यांनी 18 वर्षांचा प्रवास हा भावनिक आणि अभिमानास्पद असल्याचे सांगत, पुढील काळातही प्रत्येक घरापर्यंत हास्य, आशा आणि आपुलकी पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त केला. मालिका आता 19व्या वर्षात पदार्पण करत असून, प्रेक्षकांना नव्या रूपातील गोकुळधाम सोसायटी, नव्या कथा आणि अधिक मनोरंजक अनुभव पाहायला मिळणार आहेत. गेल्या 18 वर्षांप्रमाणेच पुढील काळातही ही मालिका प्रेक्षकांच्या चेहर्यावर हास्य फुलवत राहील, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे. ’तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री 8.30 वाजता फक्त सोनी सब वाहिनीवर प्रसारित केली जाते.

COMMENTS