Homeताज्या बातम्या

सचिन अहिर यांचा शिदेंच्या शिवसेनेत प्रवेशठाकरे गटाला धक्का; उपसभापती पदासाठी अर्ज दाखल

मुंबई : अवघ्या काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी बंड करून थेट शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झालेले असतांना मंगळवारी ठाकरे गटाचे नेते स

इतर राज्यातील मुख्यमंत्री उदयोग धंदे पळवतील अस होत नाही :अजित पवार | LOKNews24
अदृश्य हातांनी दिली निवडणुकीत साथ, खा.अशोकराव चव्हाणांचे नियोजन अन् महायुतीची एकजूट; आ.अमरनाथ राजुरकरांनी मतदारांचे मानले आभार!खा.अशोकराव चव्हाणच विजयाचे खरे शिल्पकार
कांदा व ऊस उत्पादकांना मिळणार दिलासा? मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट
📍 मुंबई | विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी #शिवसेना पक्षाच्या वतीने आमदार सचिन अहिर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला ...


मुंबई : अवघ्या काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी बंड करून थेट शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झालेले असतांना मंगळवारी ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेत थेट विधान परिषद उपसभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे ठाकरे गटाला जोरदार धक्का बसला आहे.
राज्याच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर ठाकरे यांच्या शिवसेनेचे विधान परिषद सदस्य सचिन अहिर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, नीलम गोर्‍हे, मनीषा कायंदे आणि अन्य महत्त्वाचे नेते उपस्थित होते. या घडामोडीमुळे ठाकरे गटाला विशेषतः मुंबईतील राजकारणात मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर अल्पावधीतच सचिन अहिर यांच्या भूमिकेमुळे ठाकरे गटासमोरील राजकीय आव्हाने अधिक तीव्र झाल्याचे मानले जात आहे.
सचिन अहिर यांचा प्रभाव मुंबईतील वरळी परिसरात लक्षणीय मानला जातो. आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातील सामाजिक आणि राजकीय समीकरणांमध्ये अहिर यांची स्वतंत्र ओळख असून, त्यांच्या नव्या भूमिकेमुळे स्थानिक पातळीवरील राजकीय गणिते बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी या घडामोडीवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, सचिन अहिर हे मूळचे शिवसैनिक असून त्यांना योग्य स्थान मिळावे, हा आमचा प्रयत्न आहे. त्यांच्या राजकीय प्रवासात झालेला अन्याय दूर करण्यासाठी पक्षाने त्यांना संधी दिली असल्याचे त्यांनी नमूद केले. अहिर यांनी ज्या विचारधारेतून राजकारण सुरू केले, त्याच प्रवाहात त्यांनी पुन्हा सक्रिय भूमिका स्वीकारली असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला. पक्षवाढ ही कार्यकर्त्यांच्या विश्‍वासामुळे होत असल्याचेही शिरसाट यांनी सांगितले.
सचिन अहिर यांचा राजकीय प्रवास कामगार चळवळीपासून सुरू झाला. सामाजिक कार्यातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून प्रथमच विधानसभेत निवडून आले. शिवडी मतदारसंघातून त्यांनी सलग तीन वेळा विजय मिळवला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांनी गृहनिर्माण राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती. 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा निरोप घेत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या निवडणूक मोहिमेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. शिवसेनेतील फूटीनंतर ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले होते. मात्र, आता विधान परिषद उपसभापतीपदाची उमेदवारी शिंदे गटाकडून स्वीकारत त्यांनी नवी राजकीय दिशा निवडल्याने राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.
ठाकरे गटाच्या आमदारांचे संख्याबळ घटले
सध्याच्या स्थितीत ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली विधान परिषद आणि विधानसभा मिळून पंचवीस आमदार असल्याचे सांगितले जाते. मात्र, सतत होत असलेल्या राजकीय हालचालींमुळे पुढील काळात या संख्याबळात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विधान परिषद उपसभापतीपदाची निवडणूक आता केवळ एका पदाची लढत न राहता, राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांची आणि शिवसेनेतील अंतर्गत शक्तिसंतुलनाची कसोटी ठरणार असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

COMMENTS