सामाजिक न्याय विभागाची मिनी ट्रॅक्टर योजना बंद करुन टेम्पो योजना सुरु करावी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सामाजिक न्याय विभागाची मिनी ट्रॅक्टर योजना बंद करुन टेम्पो योजना सुरु करावी

चर्मकार विकास संघाचे सामाजिक न्यायमंत्री धनंजयजी मुंडे यांना निवेदन

अहमदनगर/प्रतिनिधी : मिनी ट्रॅक्टर योजना बंद करुन नव्याने टेम्पो योजना सुरु करुन बेरोजगार युवकांना आधार देण्याच्या मागणीचे निवेदन चर्मकार विकास संघाचे

शाळेला गावाचा आधार आणि गावाला शाळेचा अभिमान वाटला पाहिजे ः अरुण भांगरे
प्रदेश काँग्रेस समितीवर नगरच्या चौघांना संधी
काबूल अपघातात फुटबॉलपटूचा मृत्यू l DAINIK LOKMNTHAN

अहमदनगर/प्रतिनिधी : मिनी ट्रॅक्टर योजना बंद करुन नव्याने टेम्पो योजना सुरु करुन बेरोजगार युवकांना आधार देण्याच्या मागणीचे निवेदन चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांनी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना दिले. या योजनेत लाभार्थींची होणारी लुट, खरा लाभार्थी योजनेपासून कसा वंचित राहतो? याबाबत सविस्तर चर्चा केली.
सामाजिक न्यायमंत्री धनंजयजी मुंडे यांनी टेम्पो योजना ही युवकांना आधार देणारी व बेरोजगारी कमी करणारी असल्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. ही योजना लागू करण्यासंदर्भात प्रशासकीयस्तरावर अभ्यास करुन ही योजना आमलात आनण्यासाठी सकारात्मकता दाखविली असल्याची माहिती खामकर यांनी दिली. सामाजिक न्याय विभाग योजनांच्या माध्यमातून अनुसुचित जाती, नवबौध्द यांच्या कल्याणकारी योजनेतून मिनी ट्रॅक्टर योजना राबविण्यात येत आहे. या योजचेचा लाभ गरजूंना होत नसल्याचे तक्रारीतुन पुढे आले आहे. मिनी ट्रॅक्टर योजना मंजुर करतांना मोठी आर्थिक लुट लाभार्थीकडून झाल्याच्या सुध्दा तक्रारी आल्या आहेत. खरा लाभार्थी मिनी ट्रॅक्टर योजनेतून वंचित असल्याचे निदर्शनास आले असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. आजची परिस्थिती बघता अनेक युवक बेरोजगार आहेत. शिक्षण घेऊन नोकरी नाही, उद्दोग व्यवसाय करण्यासाठी आर्थिक व अनेक अडचणी आहेत. या योजनेसाठी असलेल्या सामाजिक न्याय विभागाच्या जाचक अटी शिथील करुन युवकांसाठी टेम्पो योजना राबविल्यास युवकांना दैनंदिन आर्थिक उत्पन्न मिळून त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह होऊ शकणार असल्याचे स्पष्ट करुन, मिनी ट्रॅक्टर योजना बंद करुन नव्याने टेम्पो योजना सुरु करण्याची मागणी करण्यात आली आहे.

COMMENTS