Homeताज्या बातम्या

NEET पुनरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर टेलिग्रामवर तात्पुरती बंदी; ३० जूनपर्यंत ‘मेसेज एडिट’ सुविधा बंद

नवी दिल्ली : नीट-युजी (NEET-UG) पुनरपरीक्षेची पारदर्शकता आणि विश्वसनीयता कायम राखण्यासाठी केंद्र सरकारने 'टेलिग्राम' (Telegram) या मेसेजिंग ॲपवर

दक्षिण काशी पुणतांबाच्या विकासाला गती देणार; तीर्थक्षेत्रास ‘ब’ दर्जा देण्यासाठी प्रयत्न करणार – सभापती प्रा. राम शिंदे
नीट पेपरफुटी रोखण्यात टेलिग्राम ठरले अपयशी; केंद्र सरकारचे दिल्ली उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र
निधी आडवा, निधी जिरवा; नांदेड गोदावरीला प्रदूषणाच्या खाईत लोटण्याची नेत्यांची घाई!
NEET UG 2026 Re-Exam : टेलिग्रामवर २२ जूनपर्यंत बंदी; परीक्षेआधी NTA चा  मोठा निर्णय

नवी दिल्ली : नीट-युजी (NEET-UG) पुनरपरीक्षेची पारदर्शकता आणि विश्वसनीयता कायम राखण्यासाठी केंद्र सरकारने ‘टेलिग्राम’ (Telegram) या मेसेजिंग ॲपवर तात्पुरते निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (NTA) मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात ही माहिती दिली. त्यानुसार, भारतात टेलिग्रामचा वापर २२ जून २०२६ पर्यंत मर्यादित राहणार असून, मेसेज एडिट करण्याची सुविधा ३० जून २०२६ पर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

एनटीएच्या माहितीनुसार, माहिती तंत्रज्ञान कायदा २००० मधील तरतुदींनुसार इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. २१ जून रोजी होणाऱ्या नीट पुनरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर प्रश्नपत्रिका फुटल्याच्या अफवा, दिशाभूल करणारे दावे आणि बनावट पुराव्यांना आळा घालणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे.

काही व्यक्ती आणि गटांकडून टेलिग्रामवरील जुने संदेश संपादित (Edit) करून त्यामध्ये कथित प्रश्नपत्रिका किंवा कागदपत्रे जोडली जात होती. त्यानंतर परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका उपलब्ध झाल्याचा दावा करून विद्यार्थी आणि पालकांची दिशाभूल केली जात होती. टेलिग्रामवरील निर्बंध तात्पुरत्या स्वरूपाचे असून संदेश पाठवणे आणि प्राप्त करणे यासारख्या मूलभूत सुविधा काही प्रमाणात सुरू राहू शकतात; मात्र संदेश संपादनाची (Message Edit) सुविधा ३० जूनपर्यंत मिळणार नाही. विद्यार्थ्यांनी समाजमाध्यमांवर प्रसारित होणाऱ्या अपुष्ट माहितीकडे दुर्लक्ष करावे आणि केवळ अधिकृत संकेतस्थळावरील माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन एनटीएने केले आहे.

२१ जून रोजी होणार ‘नीट’ची पुनरपरीक्षा

यंदाच्या नीट-युजी परीक्षेबाबत निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पुनरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही परीक्षा २१ जून रोजी होणार असून परीक्षेच्या स्वरूपात काही बदल करण्यात आले आहेत. परीक्षेचा कालावधी १८० मिनिटांवरून १९५ मिनिटांपर्यंत वाढवण्यात आला आहे, तसेच उत्तरपत्रिकेमध्ये रफ कामासाठी अधिक जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या बदलांमुळे विद्यार्थ्यांना प्रश्न सोडवताना अधिक वेळ आणि सोयीस्कर व्यवस्था मिळणार असल्याचे एनटीएने स्पष्ट केले आहे.

COMMENTS