Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञानामुळे क्रांती – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

बीड : वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञानामुळे मोठी क्रांती घडली असून आधुनिक उपचार पद्धतींमुळे रुग्णसेवेची गुणवत्ता वाढली आहे, असे प्रतिपादन माजी मंत्र

अमरनाथ यात्रेसाठी प्रशासन सज्ज सुरक्षा, आरोग्य व स्वच्छतेला प्राधान्य
इनामी जमीन प्रश्न मार्गी; नांदेड उत्तरच्या विकासासाठी आ. कल्याणकर यांचा जिल्हाधिकार्‍यांकडे जोरदार पाठपुरावासबस्टेशन, एक्सप्रेस फिडर, उपजिल्हा रुग्णालय व वीजपुरवठा प्रश्नांवर तातडीच्या निर्णयांची मागणी
अखेर 9 वर्षांचा प्रतीक्षेचा शेवट: चर्‍हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; डॉ. गणेश ढवळे यांच्या आंदोलनाला यश

बीड : वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञानामुळे मोठी क्रांती घडली असून आधुनिक उपचार पद्धतींमुळे रुग्णसेवेची गुणवत्ता वाढली आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.
शहरातील शाहूनगर भागात सुरू करण्यात आलेल्या न्यू लाइफ हॉस्पिटल या रुग्णालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास आष्टी-पाटोद्याचे आमदार सुरेश धस, ह. भ. प. लक्ष्मण महाराज फड, ह. भ. प. कृष्णा महाराज, विलास बडगे, डॉ. योगेश क्षीरसागर, हर्षद क्षीरसागर, मदन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी बोलताना जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, डॉक्टरांना देवदूत मानले जाते, कारण ते रुग्णांना जीवनदान देतात. आज वैद्यकीय क्षेत्रात रोबोटिक शस्त्रक्रियांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे उपचार अधिक सुरक्षित आणि प्रभावी झाले आहेत. नवीन संशोधनामुळे मानवी आयुर्मान आणि जीवनमान दोन्ही उंचावले आहे. ते पुढे म्हणाले की, जगातील अनेक देशांमध्ये शंभर वर्षांहून अधिक वयाचे नागरिकही सक्रिय जीवन जगत आहेत, हे केवळ प्रगत वैद्यकीय सुविधांमुळे शक्य झाले आहे. आमदार सुरेश धस यांनी आपल्या भाषणात सांगितले की, त्यांच्या मतदारसंघातील चार डॉक्टरांनी एकत्र येऊन हे रुग्णालय उभारले ही आनंदाची बाब आहे. एकाच ठिकाणी सर्व आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणे ही काळाची गरज आहे. या डॉक्टरांनी शासकीय सेवेतून सुरुवात करून आता जनसेवेसाठी स्वतंत्र रुग्णालय उभारले आहे, हे कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. गरीब व शेतकरी कुटुंबांना सवलतीत आणि दर्जेदार उपचार मिळावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमात ह. भ. प. लक्ष्मण महाराज फड, ह. भ. प. कृष्णा महाराज यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास डॉक्टर, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS