Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पिंपरी महापालिका कर्मचार्‍यांची दिवाळी ’गोड’

पिंपरी : महापालिकेच्या अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांना दिवाळी बोनस जाहीर झाला आहे. 8.33 टक्के सानुग्रह अनुदान आणि 20 हजार रुप

एमएचटी-सीईटी परीक्षेतील गुणवंतांचा दयानंद शिक्षण संस्थेतर्फे सत्कार
ब्राईट सोशल फाउंडेशन चा मुस्लिम आरक्षणाला जाहीर पाठिंबा
मुंबई रेल्वे स्थानकात लोकलची टक्कर टळली;सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता व्यक्त

पिंपरी : महापालिकेच्या अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांना दिवाळी बोनस जाहीर झाला आहे. 8.33 टक्के सानुग्रह अनुदान आणि 20 हजार रुपये जादा रक्कम एकत्रित दिली जाणार आहे. त्यास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली. कर्मचार्‍यांना दसर्‍यापूर्वीच दिवाळी बोनस मिळणार असल्याने दसर्‍यातच दिवाळी होणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाने दिवाळी बोनसबाबत 2020 ते 2025 असे पाच वर्षांचा करारनामा केला आहे. त्यानुसार दर वर्षी दिवाळीपूर्वी महापालिकेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना बोनस, सानुग्रह अनुदान दिले जाते. यंदा एक महिना अगोदरच बोनस देण्याची प्रक्रिया राबविली जात आहे. महापालिका आस्थापनेवरील वर्ग एक ते चारमधील सहा हजार 819 अधिकारी व कर्मचार्‍यांना बोनस दिला जाणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी सांगितले.

COMMENTS