Homeताज्या बातम्याराजकारण

जीवनमान उंचावण्याचे आमचे लक्ष्य : पंतप्रधान मोदी

भाजपने संकल्पपत्राद्वारे मांडला आपला जाहीरनामा नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहचली असून, काँगे्रसने मांडलेल्या न्यायपत्राला

रोजगार निर्मितीत महाराष्ट्र आघाडीवर
‘भाईयो और बहनो…’ म्हणत राहुल गांधींनी केली पंतप्रधान मोदींची नक्कल
आर्थिक वर्षात भारत आणणार डिजीटल करन्सी

भाजपने संकल्पपत्राद्वारे मांडला आपला जाहीरनामा

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहचली असून, काँगे्रसने मांडलेल्या न्यायपत्राला भाजपने संकल्पपत्राद्वारे प्रतित्युतर दिले असून, या संकल्पपत्रात अनेक आश्‍वासने देण्यात आली आहेत. यासंदर्भात बोलतांना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आजचा दिवस शुभ असून, आज काही राज्यात नव्या वर्षाची सुरूवात होत आहे. संपूर्ण भारताला भाजपच्या संकल्प पत्राची प्रतिक्षा होती. भाजपाने दिलेले सर्व आश्‍वासने पूर्ण केली आहेत. देशातील जनतेला भाजपावर विश्‍वास आहे. हा जाहीरनाम्यामध्ये युवा, शेतकरी, नारी शक्ती, गरीबांवर आधारीत आहे. भारतीयांचे जीवनमान उंचवण्याचे आमचे लक्ष्य असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.
भाजप मुख्यालयात हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते. तसेच, भाजपचे अनेक बडे नेतेही यावेळी उपस्थित होते. पुढे बोलतांना पंतप्रधान मोदी म्हणाले की, गरीबांच्या जेवणाची थाळी पोषणयुक्त असावी, असा आमचा संकल्प आहे. मोफत राशनची योजना पुढील पाच वर्ष सुरु राहणार आहे. 70 वर्षावरील वद्धांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळणार आहे, गरीबांसाठी 3 कोटी घरे बांधण्याचा आमचा संकल्प आहे. आता घराघरांपर्यंत पाईपलाईनने गॅस पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. दरम्यान, भाजपने मांडलेल्या जाहीरनाम्यात मुद्रा योजनेच्या कर्जाची मर्यादा 20 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली असून, देशात नव्या बुलेट ट्रेनची घोषणा, गरीबांसाठी आणखी तीन कोटी घरे देण्याचा संकल्प, पीएम सूर्य घर योजनेची घोषणा, लखपती दीदी योजना, नारी शक्तीचे सशक्तीकरण यासह अनेक योजनांच्या घोषणा या संकल्पपत्रात करण्यात आल्या आहेत. शेतकर्‍यांचा सन्मान, ग्रीन एनर्जी हब, फार्मा हब, इलेक्ट्रॉनिक हब, नारी शक्तीचे सशक्तिककरण, लहान व्यापारी आणि बांधकाम मजूरांचे सशक्तिककरण, 3 कोटी लखपती दीदी बनवण्याची गॅरंटी, ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब, सुरक्षित, समृद्ध भारत, ऑलिम्पिकचे यजमानपद, शिक्षण, यासह आदी महत्वाचे मुद्दे भाजपाच्या जाहीरनाम्यात आहेत. भाजपने आपल्या जाहीरनाम्यात तरुण, शेतकरी, महिला यांच्या कल्याणासाठी कार्यक्रम राबविण्याचे सांगितले आहे. मच्छीमारांसाठी विमा सुविधा उपलब्ध करून देण्याचे आणि धान्य सुपरफूड म्हणून विकसित करण्याचे आश्‍वासनही देण्यात आले आहे. एकलव्य शाळा सुरू करण्याचे आश्‍वासनही दिले गेलेे आहे. याशिवाय, एससी-एसटी आणि ओबीसींच्या कल्याणासाठी काम करण्याचे आश्‍वासनही देण्यात आले आहे.

मोदींच्या गॅरंटीसह युक्त संकल्प : राजनाथ सिंह
केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भाजपचा जाहीरनामा प्रकाशित झाल्यानंतर म्हणाले की, जाहीरनाम्याचा प्रत्येक संकल्प हा मोदीच्या गॅरंटीसह युक्त आहे. भारतीय राजकारणात मोदींची गॅरंटी 24 कॅरेटसारखी शुद्ध मानली जाते, असं राजनाथ सिंह म्हणाले. भारतातच नाही तर जगभरातील राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यासाठी एक गोल्ड स्टँडर्ड आहे. मला विश्‍वास आहे की, जे संकल्प येथे मांडले ते 2047 पर्यंत एका विकसित भारताच्या पंतप्रधान मोदींच्या संकल्पाला आकार आणि विस्तार देईल, असे राजनाथ सिंह यावेळी म्हणाले.

COMMENTS