Homeताज्या बातम्या

बीडच्या रेल्वे प्रश्नांसाठी स्वातंत्र्य सैनिक रेल्वे आंदोलन समिती आक्रमकप्रशासनाला सहकार्याचा निर्णय; पदाधिकार्‍यांची निवड, बीड-पुणे रेल्वेची मागणी करणार

बीड जिल्ह्यातील प्रलंबित रेल्वे प्रकल्पांना गती देण्यासाठी प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचा तसेच आवश्यकतेनुसार जिल्हाधिकारी व रेल्वे अधिकार्

कांदा लिलावासाठी घालून घरी परतत असलेल्या शेतकर्‍याच्या दुचाकीची समोरासमोर धडक;एक ठार,एक गंभीर जखमी!
जनगणना 2026 मध्ये प्रत्येकाने सहभाग नोंदवावा; ही सामाजिक जबाबदारी – शेख युनूस
जिल्हास्तरीय आधार नोंदणी समितीची बैठक संपन्नशाळांमध्ये विशेष आधार शिबिरांचे आयोजन करावे-जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन



बीड जिल्ह्यातील प्रलंबित रेल्वे प्रकल्पांना गती देण्यासाठी प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचा तसेच आवश्यकतेनुसार जिल्हाधिकारी व रेल्वे अधिकार्‍यांची भेट घेऊन पाठपुरावा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय स्वातंत्र्य सैनिक रेल्वे आंदोलन समिती, बीडच्या बैठकीत घेण्यात आला. समितीचे अध्यक्ष जवाहरलाल सारडा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.
बैठकीत समितीच्या पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली. त्यामध्ये अशोकराव मनोहरराव शेटे यांची उपाध्यक्ष, रवी सुरेश उबाळे यांची सहसचिव, विष्णुदास विठ्ठलदास बियाणी यांची कोषाध्यक्ष आणि वैभव विवेक स्वामी यांची प्रसिद्धीप्रमुखपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. बीड शहरातील ज्येष्ठ सदस्य शिवाजीराव जाधव यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील रेल्वे प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. विशेषतः अहिल्यानगर-बीड-परळी वैद्यनाथ आणि येडशी-छत्रपती संभाजीनगर या महत्त्वाच्या रेल्वे मार्गांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वेचे काम मोठ्या प्रमाणात पूर्ण झाले असले तरी उर्वरित अडचणी दूर करून प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी समिती प्रशासनाला आवश्यक ते सहकार्य करणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. केवळ निवेदने देण्यापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष कामातील अडथळे दूर करण्यासाठीही समिती पुढाकार घेणार आहे. येडशी-छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्ग हा दक्षिण आणि उत्तर भारताला जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार असून या मार्गामुळे सुमारे 250 किलोमीटरचे अंतर वाचणार असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले. या मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम सुरू असून ते लवकर पूर्ण व्हावे, यासाठीही समिती सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे ठरविण्यात आले. बैठकीत ज्येष्ठ मार्गदर्शक सत्यनारायण लाहोटी आणि सुरेश मेखे यांनी रेल्वे आंदोलनाच्या पुढील वाटचालीबाबत मार्गदर्शन केले. तसेच स्वातंत्र्य सैनिक ड. रोहिदासराव कुटे आणि मिठूलाल गायके यांनी उपस्थित राहून कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली. यावेळी समितीचे सचिव सुनील क्षीरसागर यांच्यासह शांतीलाल पटेल, प्रा. मन्मथ हेरकर, भास्करराव जाधव, डॉ. अरुण भस्मे, विलासराव बडगे, अरुण डाके, मंगेश लोळगे, शिवाजी जाधव, महंमद लईक, रामचंद्र जोशी, मनमोहन कलंत्री, सुरेश बुद्धदेव, अप्पासाहेब शिंदे, राजेंद्र बंब, तुकाराम सोळंके, हमीद देशमुख, सय्यद नवीदुजम्मा, गोविंद कासट, भाऊसाहेब चंदनशीव, सोमनाथ खताळ आदींसह अनेक सदस्य उपस्थित होते.
15 ऑगस्टपासून बीड-पुणे रेल्वे सुरू करण्याची मागणी
बैठकीत 15 ऑगस्ट 2026 पासून बीड-पुणे रेल्वे सेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी रेल्वे प्रशासनाकडे करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांमार्फत रेल्वे विभागाला निवेदन देण्यात येणार असून, या मागणीसाठी समिती पुढील काळात सक्रिय पाठपुरावा करणार असल्याचे बैठकीत ठरविण्यात आले.

COMMENTS