Homeताज्या बातम्या

सरकारी डॉक्टर व कर्मचार्‍यांना मारहाणीचा आरोप फोल; पुराव्याअभावी दोघांची निर्दोष मुक्तताअ‍ॅड. सचिन आबुज यांचा प्रभावी युक्तिवाद ठरला निर्णायक

बीड : गेवराई येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांना चाकूचा धाक दाखवून मारहाण, जीवे मारण्याची धमकी देत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्य

कु. हर्मिका जगतकर यांचे बारावी विज्ञान शाखेत उल्लेखनीय यश; 76% गुणांसह उत्तीर्ण
केज शहरातील भवानी चौकात पुन्हा विचित्र अपघातभवानी चौक ठरू लागला अपघाताला निमंत्रण
चकलांबा येथे भारती बांगर इंटरनॅशनल स्कूलची बस सेवा सुरू; पालकांकडून शाळेचे आभार


बीड : गेवराई येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांना चाकूचा धाक दाखवून मारहाण, जीवे मारण्याची धमकी देत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याच्या प्रकरणात न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. पुरेशा व ठोस पुराव्याअभावी दोन आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
या प्रकरणात फिर्यादी डॉ. अरुण बबन झिंजुर्डे (वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, गेवराई) यांनी 9 जून 2016 रोजी गेवराई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, 8 जून 2016 रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास विषबाधाग्रस्त महिलेवर उपचार सुरू असताना राहुल आदिनाथ बांगर, बंडू शंकर जाधव, मुज्जू उर्फ मुर्तुजा मुस्तफा पठाण आणि आकाश अंकुश जाधव यांनी उपचारासाठी आणलेल्या दुसर्‍या रुग्णावर आधी उपचार करण्याची मागणी केली. यावरून वाद होऊन डॉक्टरांना शिवीगाळ, मारहाण, चाकूचा धाक आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा तसेच रुग्णालयातील कर्मचार्‍यांनाही धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप करण्यात आला होता. या तक्रारीवरून गेवराई पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 353, 332, 504, 506(2), 34 तसेच भारतीय हत्यार कायद्याच्या कलम 4/25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपासानंतर चार आरोपींविरुद्ध बीड येथील सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले. सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने आरोपींचा दोष सिद्ध करण्यासाठी सहा साक्षीदार तपासले. मात्र, आरोपी मुज्जू उर्फ मुर्तुजा मुस्तफा पठाण (रा. गढी) आणि आकाश अंकुश जाधव (रा. मुंबई) यांच्याविरुद्ध आरोप सिद्ध करण्याइतका ठोस व विश्वासार्ह पुरावा न्यायालयासमोर सादर होऊ शकला नाही. आरोपींचे वकील अ‍ॅड. सचिन अंबादासराव आबुज यांनी प्रभावी युक्तिवाद करत सरकारी पक्षाच्या पुराव्यातील त्रुटी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यांचा बचाव ग्राह्य धरत मा. सत्र न्यायाधीश, बीड यांनी 1 जुलै 2026 रोजी मुज्जू उर्फ मुर्तुजा मुस्तफा पठाण आणि आकाश अंकुश जाधव यांची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात अ‍ॅड. सचिन आबुज यांना अ‍ॅड. एल. एम. काकडे यांचे मार्गदर्शन लाभले, तर अ‍ॅड. पूजा जाधव आणि ईशान रासकर यांनी सहकार्य केले.

COMMENTS