Homeताज्या बातम्यासंपादकीय

देदीप्यमान स्मारकाऐवजी पिलर्सवर छत्रपती! 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने राज्यकर्ते बनलेल्या महाराष्ट्रातील सर्वच पक्षाच्या राज्यकर्त्यांनी शिवस्मारकाचे नेमके झाले काय, याचे अद्यापह

ओबीसींना न्याय नाकारणारे आरक्षण मागताहेत ! 
धक्के : तीन राजकीय, एक सामाजिक!
भारत जोडो नव्हे, लाॅंचिंग कार्यक्रम!

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने राज्यकर्ते बनलेल्या महाराष्ट्रातील सर्वच पक्षाच्या राज्यकर्त्यांनी शिवस्मारकाचे नेमके झाले काय, याचे अद्यापही महाराष्ट्राला उत्तर दिलेले नाही! सन २०१८ मध्ये अरबी समुद्रात मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज यांचे २१० मीटर म्हणजे जवळपास ६९० फुटांचा पुतळा मुंबईच्या गिरगाव चौपाटी समुद्रकिनाऱ्यासमोर दीड किमी अंतरावर खडकांच्या मानवनिर्मित बेटावर बसवला जाणार होता. राज्य मंत्रिमंडळाने १ नोव्हेंबर २०१८ रोजी प्रकल्प अहवालाला प्रशासकीय मान्यता दिली होती आणि एकूण सदोतीसशे कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी दिली होती. राज्याने दिलेल्या अधिकृत मंजुरीनुसार सन २०२१ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिवस्मारक अरबी समुद्रात उभारले गेले पाहिजे होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रात मुंबईच्या किनार्‍यावरील पुतळ्यासाठी महाराष्ट्राच्या तिजोरीतून रुपये खर्च होणार करून नंतर सुधारित प्रस्तावानुसार २०२२ पर्यंत प्रकल्पाच्या सर्व बाजूंचे बांधकाम पूर्ण होईल, अशा प्रकारचे आश्वासन दिले गेले होते. प्रकल्पाला महाविकास आघाडी आणि आता असलेले शिंदे-भाजप सरकार यांची दोन्ही सरकारांची सारखीच मान्यता असतानाही हे शिवस्मारक उभारले का जात नाही, हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे. याउलट, दोन दिवसांपूर्वी पुन्हा एकदा राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराज यांच्या विषयी अपमानजनक शब्द वापरल्यावर सुध्दा शिंदे-भाजप आणि या सरकारमधील प्रतिनिधी त्यांच्या शब्दाविषयी सारवासारव करण्याचा प्रयत्न करीत आहेत तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी केवळ बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी करणारे आंदोलनाची भाषा करीत आहेत परंतु प्रत्यक्षात महाविकास आघाडीने देखील रस्त्यावर उतरण्याचे टाळलेले आहे याचाच अर्थ छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव केवळ सत्तेवर येण्यासाठी वापरण्याचा षड्यंत्रात्मक भाग महाराष्ट्राच्या राजकारणात दिसून येत आहे, असेच दुर्दैवाने म्हणावे लागेल. महाराष्ट्राच्या राजकारणात छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन सत्तास्थानी जाणाऱ्या आणि विरोधी पक्ष इतकी ताकद मिळवणारा सर्वच राजकीय पक्षांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे केवळ नावच वापरण्याचा चंग बांधलेला आहे, असेच एकूण दिसते.  याउलट नगर शहरामध्ये जर आपण पाहिलं तर एका उड्डाणपुला खालच्या पिलर्सवर छत्रपती शिवाजी महाराज यांची चित्रे काढून एक प्रकारे वरून जाणाऱ्या-येणाऱ्या वाहने यांच्या खाली या रयतेच्या राजाची अवहेलना करणारी चित्रांची संकल्पना आणणाऱ्यांचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रातील सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांना म्हणजे मावळा म्हणून तरुणांना एकत्र करून स्वराज्याची स्थापना केली. या मावळ्यांना  घेऊन स्थापन केलेल्या स्वराज्यात  बहुजन रयतेला सुख-समृध्दी मिळवून दिली; त्या आमच्या राजांचा अपमान कधीही सहन केला जाणार नाही! त्यामुळेच केवळ राजकीय सत्ता मिळवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा वापर करून सत्ता मिळवायची आणि सत्ता मिळाली की, आपल्याच राजाची हेळसांड करायचे, हे धोरण दुटप्पी आणि आपमतलबी आहे. बहुजन रयतेच्या या राजाचे अरबी समुद्रातील विशाल शिवस्मारक पाहण्याऐवजी आमच्यासारख्यांना नगर शहरातील पुलाच्या पिलर्सवर छत्रपती शिवाजी महाराजांची रेखाटलेली चित्रे पाहून महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांची आणि राजकारण्यांची आम्हाला लाज वाटायला लागते! अशा शब्दात बोलताना आम्हालाही वेदना होतात! 

COMMENTS