Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुषमा अंधारेंची 40 भावांना राखी बांधण्याची इच्छा

मुंबई : देशभरात भाऊ आणि बहिणींच्या अतुट नात्यांचा पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन साजरा केला जात असतांना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील

संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी थंड का पडली? 
सुषमा अंधारे आमदार शिरसाटांवर ठोकणार तीन रूपयांचा दावा
व्यसनातून पिढी बरबाद होऊ नये – सुषमा अंधारे 

मुंबई : देशभरात भाऊ आणि बहिणींच्या अतुट नात्यांचा पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन साजरा केला जात असतांना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील त्यांच्या भावंडांना या सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. उद्धव ठाकरे यांची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या 40 आमदारांसाठी सुषमा अंधारे यांनी राखी खरेदी केली असल्याचे सांगितले आहे. रक्षाबंधनानिमित्त बोलताना अंधारे म्हणाल्या आहेत की, ते 40 जण माझे भाऊ, त्यांना राखी बांधण्याची माझी इच्छा आहे. किमान एक तरी भावाने आज माझ्याकडे रक्षाबंधनासाठी यावे, अशी भावना सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली आहे.

COMMENTS