Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महिलेची पोलिसांना हात कापून टाकण्याची धमकी

मुंबई/प्रतिनिधी ः वांद्रे वरळी सी-लिंकवर दुचाकीला परवानगी नाही, हे सगळ्यांनाच माहिती आहे, दरम्यान वांद्रे वरळी सी-लिंकवर जॉयराईडसाठी मोटरसायकल घे

कृषि उद्योजकतेच्या आधारावर आपण जगावर राज्य करु ः डॉ.पाठक
कासट,मानधने चांडक यांची जिल्हा माहेश्वरी सभेवर वर्णी
आईचा गर्भ आणि कबर दोनच ठिकाण सुरक्षित

मुंबई/प्रतिनिधी ः वांद्रे वरळी सी-लिंकवर दुचाकीला परवानगी नाही, हे सगळ्यांनाच माहिती आहे, दरम्यान वांद्रे वरळी सी-लिंकवर जॉयराईडसाठी मोटरसायकल घेऊन जाणार्‍या मध्य प्रदेशातील महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, एका वाहतूक पोलिसाने वांद्रे वरळी सी-लिंकवरुन जाण्यास महिलेला रोखले, त्यानंतर महिलेमध्ये आणि वाहतूक पोलिसांत शाब्दिक चकमक झाली अन् महिलेनं थेट एक गन काढून पोलिसाला धमकावले.
यावेळी शिवीगाळ, धमक्या तिने पोलिसांना दिल्या असून हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. महिला वरळी सी-लिंकवर दुचाकी पळवत असल्याने पोलीस कर्मचार्‍याने तिला रोखले होते. यावेळी महिलेने आपली चूक मान्य करण्याऐवजी वाद घालण्यास सुरुवात केली. यादरम्यान, तिने पोलिसांसाठी अपशब्द वापरले. तिच्याकडे असलेली गन खरीखुरी गन नसून टॉयगन असल्याचे काही काळातच लक्षात आले. मात्र महिलेने दुचाकी रोखल्यानंतर ती बंद करण्यास सांगितले असता पोलीस कर्मचार्‍याला धक्काबुक्कीही केली. इतकेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोन केल्यानंतरच मी बाईक बंद करणार अशा शब्दांमध्ये वाद घातला. कर्मचार्‍याने बाईक बंद करण्याचा प्रयत्न केला असता, ती संतापली आणि जाहीरपणे धमकावू लागली. हात कापून टाकेन, माझ्या गाडीला हात लावण्याची हिंमत कशी झाली, अशा शब्दांत महिलेने धमकी दिली. ती एवढ्यावरच थांबत नाही तर ती, जा जाऊन नरेंद्र मोदींना फोन करा, त्यांनी जर मला सांगितले नुपूर गाडी बंद कर, तरच मी करणार, असे उद्धटपणे सांगत महिलेने अरेरावी सुरू केली. नुपूर पटेल मध्य प्रदेशातील जबलपूर येथील रहिवासी असून बुलेट तेथील एका रिअल इस्टेटच्या नावावर नोंद आहे. महिलेला कलम 41-ए अंतर्गत तपास अधिकार्‍यासमोर हजर राहण्यासाठी नोटीस देण्यात आली आहे. यानंतर तिला जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. 

COMMENTS