Homeमहाराष्ट्रमुंबई - ठाणे

दीपाली चव्हाण यांच्या कुटूंबाला न्याय मिळण्यासाठी खंबीरपणे पाठीशी : ऍड. यशोमती ठाकूर

दिवंगत दीपाली चव्हाण यांच्या कुटूंबाला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू.

नागपुरमध्ये आयकरच्या 9 कर्मचार्‍यांना सीबीआयकडून अटक
प्रेमविवाह केल्याने तरुणावर ‘सैराट” सारखा जीवघेणा हल्ला | LOKNews24
पुणे भाजपमधील गटबाजी चव्हाटयावर

अमरावती : दिवंगत दीपाली चव्हाण यांच्या कुटूंबाला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. आपण खंबीरपणे चव्हाण कुटुंबाच्या  पाठीशी आहोत,  असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज मोरगाव येथे सांगितले. 

महिला व बालविकास मंत्री श्रीमती ठाकूर यांनी आज नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मोरगाव येथे जाऊन दिवंगत दीपाली चव्हाण यांच्या कुटूंबाला भेट दिली व त्यांचे सांत्वन करून दिलासा दिला. कुटुंबातील व्यक्ती जाण्याने होणारी हानी कधीही भरून येत नाही. या कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दीपालीसारखी एक कर्तबगार अधिकारी आपल्यातून निघून गेली आहे. या कुटूंबाला न्याय मिळवून देण्यासाठी एक कुटूंबीय म्हणून मी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी राहीन, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. दीपाली यांचे पती राजेश मोहिते, सासू, दीर व नातेवाईक यावेळी उपस्थित होते. प्रारंभी पालकमंत्री यांनी दीपाली चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. त्यांनी  चव्हाण यांच्या कुटूंबातील प्रत्येक सदस्याशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले. दिवंगत दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी जबाबदार व्यक्तींना कठोर शिक्षा होण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करू. यापुढे असे प्रकार घडू नये यासाठी विशाखा समित्या तत्काळ कार्यान्वित करण्याचे आदेश दिले आहेत. मेळघाटात कार्यरत महिला अधिकारी व कर्मचारी यांची माहिती सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी यंत्रणेला दिले.

COMMENTS