Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

साखळी उपोषणास त्रिदल माजी सौनिक सेवा संघाचा पाठिंबा

मराठा आरक्षण उपोषणास राजेवाडी ग्रामस्थांचा सहभाग

जामखेड ः मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या आठ दिवसांपासून बसलेल्या मनोज जरांगें पाटलांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जामखेड येथे साखळी उप

कायदा हा सर्वांसाठी समान कायद्याचे उल्लंघन करणे हा गुन्हा ठरतो,- जिल्हा न्यायाधीश मुजीब एस शेख
सरसकट पंचनामे करून शेतकर्‍यांना भरीव मदत द्या ः नागरे
अहमदनगर शहरात राष्ट्रवादीला जबर झटका… माजी विरोधीपक्षनेता काँग्रेसमध्ये सामील

जामखेड ः मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या आठ दिवसांपासून बसलेल्या मनोज जरांगें पाटलांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जामखेड येथे साखळी उपोषण चालू आहे. प्रत्येक दिवशी तालुक्यातील एक गाव याप्रमाणे 1 नोव्हेंबर रोजी राजेवाडी येथील मराठा बांधव व भजनी मंडळ यांनी सहभाग घेतला. या साखळी उपोषणास जामखेड येथील माजी सैनिक संघटनेच्या वतीने पाठींबा देण्यात आला.
यावेळी बोलताना कॅप्टन लक्ष्मण भोरे म्हणाले की, त्रिदल आजी-माजी सैनिक संघटना सामाजिक, धार्मिक कार्यात नेहमीच तत्पर असते. सैनिकाना कोणतीही जात नसते.  सैनिक जातीय सलोखा राखुन असतो. मानवता हीच सैनिक जात असते. त्याच प्रमाणे झेंडाही कोणत्याही पक्षाचा किंवा कोणत्याही रंगाचा आहे. मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांना आपल्या जामखेड पंचक्रोशीतील सर्व त्रिदल आजी माजी सैनिक परीवाराच्या वतीने जाहीर पाठींबा देत आहोत.यावेळी तहसिलदार योगेश चंद्रे व पोलीस निरीक्षक महेश पाटील तसेच उपोषणकर्त्यांही पाठिंब्याचे निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष सेवा निवृत्त कॅप्टन लक्ष्मण भोरे, सचिव शहाजी ढेपे, कोषाध्यक्ष राजकुमार भराटे, सल्लागार सुग्रीव अडाळे, मार्गदर्शक अरविंद जाधव, संचालक अशोक चव्हाण, सदस्य जगन्नाथ धर्माधिकारी, रमेश मोरे, काशिनाथ शिंदे, अंजुम शेख, नानासाहेब कार्ले, केशव ननवरे, नवनाथ अंधळे, मुस्तफा शेख, दत्तात्रय डिसले, विजय लेकूरवाळे, विठ्ठल लेकूरवाळे, रावसाहेब कापसे, रामा गोरे आदी आजी माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थिती होते. राजेवाडी येथील मराठा बांधवांचा साखळी उपोषणात सहभाग घेतला दिवसभर या ठिकाणी राजेवाडी ग्रामस्थ व भजनी मंडळाच्या वतीने  भजन करत आंदोलन करण्यात आले. मराठा आरक्षणासाठी पाठिंबा म्हणून तालुक्यातील खर्डा आरणगाव येथे साखळी उपोषण सुरू आहे. अनेक गावात लाक्षणिक उपोषण केले जात आहे.

COMMENTS