Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कणगर येथील शेतकऱ्याची आत्महत्या

देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यातील कणगर येथे एका ४० वर्षीय व्यक्तीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. विठ्ठल नामदेव घाडगे (वय ४०, रा. कणगर ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. कणगर येथिल सुरत-ग्रीन फिल्ड राष्ट्रीय महामार्गासाठी या शेतकऱ्यांची जमिन संपादीत केल्याने व त्याचा अपेक्षित मोबदला मिळाला नसल्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याचे मयताचा भाऊ इंद्रभान घाडगे यांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार विठ्ठल घाडगे हे मंगळवार पासून बेपत्ता होते. घाडगे यांचा मृतदेह कनगर येथील शेतामध्ये बुधवारी आढळून आला. शेतात अत्यवस्थेत आढळून आल्याने रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे यांच्या मदतीने त्यांना तातडीने राहुरी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. कणगर येथिल सुरत-ग्रीन फिल्ड राष्ट्रीय महामार्गासाठी १ हेक्टर ७२ गुंठे या शेतकऱ्यांची जमिन संपादीत केल्याने व त्याचा अपेक्षित मोबदला मिळाला नाही.शेतीसाठी कर्ज मिळत नसल्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याचे मयताचा भाऊ इंद्रभान घाडगे यांनी सांगितले. दरम्यान, पोलीस हवालदार बाबासाहेब शेळके यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. घाडगे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई, भाऊ आणि भावजय असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे

दूध भेसळ करणार्‍यांना चाप !
हिंद महासागरात तणावाची ठिणगी; इराणचा अमेरिकेच्या तळावर हल्ला
भारतच युद्ध थांबवू शकतो : सरसंघचालक

देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यातील कणगर येथे एका ४० वर्षीय व्यक्तीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. विठ्ठल नामदेव घाडगे (वय ४०, रा. कणगर ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. कणगर येथिल सुरत-ग्रीन फिल्ड राष्ट्रीय महामार्गासाठी या शेतकऱ्यांची जमिन संपादीत केल्याने व त्याचा अपेक्षित मोबदला मिळाला नसल्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याचे मयताचा भाऊ इंद्रभान घाडगे यांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार विठ्ठल घाडगे हे मंगळवार पासून बेपत्ता होते. घाडगे यांचा मृतदेह कनगर येथील शेतामध्ये बुधवारी आढळून आला. शेतात अत्यवस्थेत आढळून आल्याने रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे यांच्या मदतीने त्यांना तातडीने राहुरी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.

कणगर येथिल सुरत-ग्रीन फिल्ड राष्ट्रीय महामार्गासाठी १ हेक्टर ७२ गुंठे या शेतकऱ्यांची जमिन संपादीत केल्याने व त्याचा अपेक्षित मोबदला मिळाला नाही.शेतीसाठी कर्ज मिळत नसल्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याचे मयताचा भाऊ इंद्रभान घाडगे यांनी सांगितले. दरम्यान, पोलीस हवालदार बाबासाहेब शेळके यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. घाडगे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई, भाऊ आणि भावजय असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे

COMMENTS