Homeमुंबई - ठाणेराजकारण

हिंद महासागरात तणावाची ठिणगी; इराणचा अमेरिकेच्या तळावर हल्ला

नवी दिल्ली : हिंद महासागरातील सामरिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे डिएगो गार्सिया पुन्हा एकदा जागतिक तणावाच्या केंद्रस्थानी आले आहे. इर

आरोग्य भरतीतील बिंदू नामावलीत घोटाळा; आमदार पडळकरांचा भाजप सरकारला घरचा आहेर
बळीराजा संकटात! अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा
अशोक खरात प्रकरणाचा दणका; मुख्यमंत्री फडणवीसांच्या आदेशानंतर रूपाली चाकणकर यांचा राजीनामा

नवी दिल्ली : हिंद महासागरातील सामरिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे डिएगो गार्सिया पुन्हा एकदा जागतिक तणावाच्या केंद्रस्थानी आले आहे. इराणने या बेटावरील अमेरिकन लष्करी तळावर क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा दावा केल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
सुमारे चार हजार किलोमीटर अंतरावरून दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागण्यात आली. मात्र, अमेरिकाने पहिल्या क्षेपणास्त्राला हवेतच निष्प्रभ केल्याचा दावा केला आहे. दुसर्‍या क्षेपणास्त्रावर युद्धनौकेवरून इंटरसेप्टर प्रक्षेपित करण्यात आल्याचे सांगितले जात असले, तरी ते यशस्वी ठरले की नाही, याबाबत अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. या घटनेमुळे ब्रिटनसह पाश्‍चात्त्य देशांच्या सुरक्षाव्यवस्थेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. चागोस द्वीपसमूहातील हे बेट अमेरिका-ब्रिटनच्या संयुक्त लष्करी तळासाठी ओळखले जाते. मध्य पूर्व, आफ्रिका आणि आशियातील कारवायांसाठी हा तळ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. लांब पल्ल्याचे बॉम्बर, पाणबुड्या आणि प्रगत निगराणी यंत्रणांनी सज्ज असलेला हा तळ ‘हिंद महासागरातील अढळ विमानवाहू जहाज’ म्हणूनही ओळखला जातो. या हल्ल्याच्या दाव्यामुळे इराणच्या क्षेपणास्त्र क्षमतेबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी दोन हजार किलोमीटरपर्यंतच पल्ला असल्याचे सांगितले जात असताना, प्रत्यक्षात तीन ते चार हजार किलोमीटरपर्यंत पोहोचण्याची क्षमता असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हा दावा केवळ लष्करी शक्तीचे प्रदर्शन नसून, अमेरिकेच्या दूरस्थ तळांनाही धोका निर्माण करण्याची सामरिक सूचना असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
या वाढत्या तणावाचे पडसाद जागतिक अर्थव्यवस्थेत उमटू लागले आहेत. इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे इंधनदरात वाढ झाली असून त्याचा परिणाम विविध उद्योगांवर होत आहे. प्लास्टिक आणि पॉलिमरसारख्या कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने उत्पादन खर्चात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यातच वाढलेला वाहतूक खर्च आणि रुपयाचे अवमूल्यन यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. याचा थेट परिणाम ग्राहकांवर होण्याची चिन्हे दिसत आहेत. एप्रिलपासून दैनंदिन वापरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये तीन ते दहा टक्क्यांपर्यंत दरवाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वातानुकूलन यंत्रांच्या किमतीत तीन ते पाच टक्के, शीतकपाटांमध्ये चार ते पाच टक्के, तर कपडे धुण्याच्या यंत्रांमध्ये आठ ते दहा टक्क्यांपर्यंत वाढ अपेक्षित आहे. वाहन उद्योगातही दोन ते तीन टक्क्यांची दरवाढ संभवते. उद्योग क्षेत्रातील जाणकारांच्या मते, वाढत्या खर्चाचा पूर्ण भार कंपन्यांना स्वतः उचलणे शक्य नसल्याने दरवाढ अपरिहार्य ठरत आहे. परिणामी, आंतरराष्ट्रीय तणावाचे ओझे अखेरीस सर्वसामान्य ग्राहकांवरच पडण्याची चिन्हे अधिक स्पष्ट होत आहेत.


वाहने आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू महागण्याची शक्यता
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावामुळे जागतिक बाजारपेठेत मोठे आर्थिक परिणाम दिसू लागले असून त्याचा थेट फटका भारतातील ग्राहकांना बसण्याची शक्यता आहे. एप्रिलपासून फ्रिज, एसी आणि वॉशिंग मशीनसारख्या दैनंदिन वापराच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमतीत तीन ते दहा टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर वाहन उद्योगात सुमारे 2 ते 3 टक्क्यांनी दरवाढ होण्याची शक्यता आहे.

COMMENTS