Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीगोंदा नगरपरिषदेकडून मालमत्ता करावर १०० टक्के दंड माफी 

श्रीगोंदा : नगरपरिषद हद्दीतील थकबाकीदार नागरिकांसाठी दिलासा देणारी महत्त्वाची योजना जाहीर करण्यात आली आहे. नगरपरिषदेच्या वतीने ‘अभय योजना’ लागू करण्यात आली असून या अंतर्गत मालमत्ता कराच्या थकबाकीवरील दंड/शास्तीमध्ये तब्बल १०० टक्के माफी देण्यात येणार आहे. नगरपरिषद प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज नगरपरिषद कार्यालयात सादर करावेत.कार्यालयीन कामकाज सकाळी १० ते सायंकाळी ६.३० या वेळेत सुरू राहणार आहे. नागरिकांना त्यांच्या थकबाकीची माहिती घरबसल्या मिळावी यासाठी ‘महाभूलेख’ संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच ऑनलाइन पद्धतीनेही मालमत्ता कर भरण्याची सोय करण्यात आली आहे, ज्यामुळे थकबाकी व सवलतीची रक्कम सहज पाहता येणार आहे. योजनेच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी थकबाकीची संपूर्ण रक्कम एकरकमी भरणे आवश्यक आहे.योजना केवळ मर्यादित कालावधीसाठी म्हणजेच ३१ मार्च २०२६ पर्यंत लागू राहणार आहे. चालू वर्षाच्या करावर कोणतीही माफी मिळणार नाही. योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रथम चालू वर्षाचा कर भरणे बंधनकारक आहे. ही योजना प्रथमच राबविण्यात येत असून थकबाकीदारांनी या संधीचा लाभ घेऊन नगरपरिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

जामखेड बाजार समितीचे हमीभाव केंद्र सुरू; शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा
’बाप लेकीचे नाते’ कवितेने आणले देवळालीकरांच्या डोळ्यात पाणी
पेट्रोल व डिझेल न देण्याच्या सक्त सूचना ; फक्त अत्यावश्यक सेवेसाठीच मिळणार | ‘आपलं नगर’ | LokNews24

श्रीगोंदा : नगरपरिषद हद्दीतील थकबाकीदार नागरिकांसाठी दिलासा देणारी महत्त्वाची योजना जाहीर करण्यात आली आहे. नगरपरिषदेच्या वतीने ‘अभय योजना’ लागू करण्यात आली असून या अंतर्गत मालमत्ता कराच्या थकबाकीवरील दंड/शास्तीमध्ये तब्बल १०० टक्के माफी देण्यात येणार आहे.

नगरपरिषद प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज नगरपरिषद कार्यालयात सादर करावेत.कार्यालयीन कामकाज सकाळी १० ते सायंकाळी ६.३० या वेळेत सुरू राहणार आहे.

नागरिकांना त्यांच्या थकबाकीची माहिती घरबसल्या मिळावी यासाठी ‘महाभूलेख’ संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच ऑनलाइन पद्धतीनेही मालमत्ता कर भरण्याची सोय करण्यात आली आहे, ज्यामुळे थकबाकी व सवलतीची रक्कम सहज पाहता येणार आहे.

योजनेच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी थकबाकीची संपूर्ण रक्कम एकरकमी भरणे आवश्यक आहे.योजना केवळ मर्यादित कालावधीसाठी म्हणजेच ३१ मार्च २०२६ पर्यंत लागू राहणार आहे. चालू वर्षाच्या करावर कोणतीही माफी मिळणार नाही. योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रथम चालू वर्षाचा कर भरणे बंधनकारक आहे. ही योजना प्रथमच राबविण्यात येत असून थकबाकीदारांनी या संधीचा लाभ घेऊन नगरपरिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS