Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एनएमएमएस परीक्षेत प्राज्ञिक गोरडे याचे यश

शेवगाव तालुका ः महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत 2023-2024 मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एनएमएमएस) परीक्षेत

चिखलठणवाडीला मिळाले हक्काचे डाक कार्यालय
WhatsApp युजर्सचा डेटा सुरक्षित नाही, सायबर एक्सपर्ट्सचा इशारा |
अक्षय पवार ठरला मल्हार केसरीचा मानकरी

शेवगाव तालुका ः महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत 2023-2024 मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एनएमएमएस) परीक्षेत श्री पांडुरंग माध्यामिक विद्यालय वरुर या विद्यालयातील विद्यार्थी प्राज्ञिक राजीव गोरडे याने  घवघवीत यश संपादन केले. तसेच तो छत्रपती शाहू महाराज ’सारथी’ शिष्यवृत्तीसाठीही पात्र ठरला आहे. विद्यालयातर्फे प्राज्ञिकचा व त्याच्या पालकाचा वरुर सेवा सोसायटीचे चेअरमन मधुकर वावरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी माजी सरपंच भागवत लव्हाट, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष खडके, साहेबराव रेवडकर, अशोक खांबट आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक सुशीलकुमार नागापुरे, शिक्षक प्रशांत लबडे, जालिंदर शेळके, राजेंद्र जमधडे आदींनी प्राज्ञिकचा त्याच्या उज्वल यशाबद्दल गौरव केला. गणित विषय शिक्षक विकास काळे यांचेही प्राज्ञिकला मार्गदर्शन लाभले. यावेळी मार्गदर्शक शिक्षक शरद भोसले यांचाही सत्कार करण्यात आला.  

COMMENTS