Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जलजीवन योजेनेत वागदर्डी धरणातून दरेगाव या गावाला शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध करून द्यावा

दरेगावच्या ग्रामस्थांचे मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांना निवेदन

नाशिक प्रतिनिधी - चांदवड तालुक्यातील दरेगाव या  गावाची जलजीवन योजनेची  व्याप्ती वाढवून   या योजेअंतर्गत वागदर्डी धरणातून स्वतंत्र पाणीपुरवठा

पृथ्वी-2 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
पोलिसांनी दखल घेतली आणि मुलीची सुटका झाली…
उपांत्य फेरीत इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान बरोबर भारताचा नंबर लागणार ?

नाशिक प्रतिनिधी – चांदवड तालुक्यातील दरेगाव या  गावाची जलजीवन योजनेची  व्याप्ती वाढवून   या योजेअंतर्गत वागदर्डी धरणातून स्वतंत्र पाणीपुरवठा योजना देऊन ग्रामस्थांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवावा ,अशी मागणी  दरेगाव ग्रामस्थांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे नाशिक जिल्हाचे पालकमंत्री दादाजी भुसे यांची मुंबई येथील वर्षा बंगला या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन निवेदन सादर केले . दरम्यान पालकमंत्री नामदार दादाजी भुसे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आपण या प्रश्नांवर   जातीने लक्ष घालू असे आश्वासन शिस्टमंडळाला दिले आहे . चांदवड तालुक्यातील शिंगवे, दरेगाव, डोनगाव , वाद वराडी, निमोनसह चांदवडच्या दुष्काळी गावातील ग्रामस्थांची ही आहे. त्यामुळे या ग्रामस्थांकडून  सद्याच्या जलजीवन योजनेला सकारात्मक प्रतिसाद नसल्याचे चित्र तयार झाले आहे. जोपर्यंत शाश्वत पिण्याचा पाण्याचा स्त्रोत उपलब्ध होत नाही तोपर्यंत या योजनेवर होणारे कोट्यावधी रुपये खर्च पाण्यात जाणार आहे त्यासाठी उन्हाळ्यात शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध करण्यात यावा, त्यासाठी वागदडी  धरणालगत विहिरींना जागा उपलब्ध  करून या गावांना पाणीपुरवठा करावा , अशी मागणी नागरिकांची  आहे.

ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला  शुद्ध पाणी मिळावे , हर घर जल या हेतूने जलजीवन मिशन हाती घेण्यात आले आहे. मात्र चांदवड तालुक्यातील दरेगाव, व आजूबाजूच्या गावांनी आम्हाला जलजीवन योजनेतून पाणीपुरवठा करतांना सदर योजनेत सध्याच्या योजनेची व्याप्ती वाढवून वागदर्डी धरणातून पाणीपुरवठा योजना द्यावी अशी मागणी केली आहे. .   तालुक्यातील पूर्व भागातील अनेक गावांत कायमच फेब्रुवारीनंतर विहिरी तळ गाठतात. एप्रिल, मे मध्ये तर तीव्र पाणीटंचाई असते. मग जलजीवन योजनेतंर्गत तयार करणाऱ्या विहिरींना तरी कसे पाणी राहिल. हे माहिती असताना देखील प्रशासन याठिकाणी जलजीवन  योजनेतंर्गत पाणीपुरवठा योजना राबवून  पैसा पाण्यात घालण्याचे धोरण आखत  आहे.   त्यापेक्षा पूर्व भागातील दरेगाव, डोणगाव, शिंगवे वाद वराडी, निमोण या गावातील जनतेला वागदर्डी धरणाजवळ विहीर खोदून मग पाणी योजना राबवावी  गावांना बाराही महिने पाणी उपलब्ध होईल  अशी योजना राबविण्यात यावी.

मनमाड साठी आता करंजवण धरणातून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे पाणी योजना होते आहे. त्यामुळे यापूर्वी मनमाड ला पाणी पुरवठा करणा-या वागदर्डी धरणातून पाणी उपलब्ध होऊ शकेल किंवा धरणाजवळ विहीर खोदून या गावांना कायमस्वरूपी पाणी पुरवठा होऊ शकतो.  असंही वागदर्डी धरण चांदवड तालुक्यातच आहे.   तर आता जलजीवन च्या आराखड्यात बदल करून नवीन योजना राबविता येऊ शकते. किंवा या गावांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कडून नवीन स्वतंत्र पाणी पुरवठा योजना राबविण्यात यावी. व या योजनेसाठी शंभर टक्के सौर ऊर्जा वर आधारित पाणी उचलण्याची यंत्रणा असावी असेच इथल्या नागरिकांनाही वाटते आहे. तरी शासस्तरावरून लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा,    ,  

दरेगाव  गावाला नवीन विहिरीसाठी वागदर्डी धरणालगत जागा मिळावी.   उन्हाळ्यात गावात विहिरीला पाणी राहत नाही पाण्यासाठी एक दोन किलोमीटर पर्यंत वणवण करावी लागते विहिरीला नवीन जागा देऊन स्वच्छ व शुद्ध पिण्यायोग्य पाणी मिळावे यासाठी वागदडी धरणालगत जागा उपलब्ध करून द्यावी –        आमच्या गावात या आधीही पाणीपुरवठ्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आले,  परंतु गावात उन्हाळ्यात कुठेच विहिरीला पाणी नसल्याने सर्वच पाणीपुरवठा योजना फेल झाल्या आहेत. नाग्या -साग्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनाही बंद पडली आहे. महिलावर्ग आजही पाण्यासाठी पायपीट करत आहे. या मातृ भगिनींच्या हाल अपेष्टा संपवण्यासाठी   गावात बारा महिने पाणी पुरवठ्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत वागदर्डी धरणाजवळ विहीर खोदली तर निश्चितच गावाला उन्हाळ्यातही पिण्याचे पाणी मिळेल   . तरी आमच्या मागण्याची तात्काळ दखल घेऊन शाश्वत पाणी उपलब्ध करून द्यावे ही  मागणी निवेदनाद्वारे दरेगाव सरपंच    सरला जालिंदर पवार  . दरेगाव सोसायटीचे माजी चेअरमन विक्रम देवरे , सोसायटी संचालक विक्रम गांगुर्डे,  विक्रम  पगार , जालिंदर  पवार   यांनी मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर जाऊन निवेदन सादर केले . यावेळेस पालकमंत्री दादाजी भुसे तसेच शिवसेना संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी आदी उपस्थित होते.

COMMENTS