Homeताज्या बातम्या

‘उमेद’ फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या संचालक मंडळाचा अभ्यास दौरा संपन्न शेतीपूरक उद्योग, सेंद्रिय शेती व प्रक्रिया उद्योगांची मिळाली माहिती

बीड: महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (स्मार्ट प्रकल्प) अंतर्गत भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (RSETI), बीड यांच

गँगस्टर अतीक अहमदचा मुलगा अपघातात ठार
युक्रेनमधील क्षेपणास्त्र हल्ल्यात चार भारतीयांचा मृत्यू; व्यापारी मालवाहू जहाजावर हल्ल्यानंतर भारताचा तीव्र निषेध
जनकल्याण मराठी पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी प्रशांत बाफना यांची निवड; अहिल्यानगरमधून कौतुकाचा वर्षाव

बीड: महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (स्मार्ट प्रकल्प) अंतर्गत भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (RSETI), बीड यांच्या वतीने ‘उमेद’ फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या संचालक मंडळासाठी अभ्यास दौर्‍याचे आयोजन करण्यात आले होते. या दौर्‍याच्या माध्यमातून महिला संचालकांना शेतीपूरक उद्योग, आधुनिक कृषी तंत्रज्ञान तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या यशस्वी व्यवस्थापनाची माहिती देण्यात आली. दिनांक 4 ऑगस्ट 2026 रोजी ‘उमेद’ फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या संचालक मंडळाने बीड तालुक्यातील बोरखेड (वडवाडी) येथील क्रिएटिव्ह फार्मर प्रोड्युसर कंपनीला भेट दिली. या अभ्यास दौर्‍यादरम्यान क्रिएटिव्ह फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक कृषिभूषण श्री. अभिमान अवचार यांनी उपस्थित महिला संचालकांना कंपनीच्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी कोल्ड स्टोरेजची उभारणी व उपयोग, सेंद्रिय खत निर्मिती प्रक्रिया, गिर गायीचे संगोपन, दुग्ध व्यवसाय, धान्याचे प्रतवारीकरण व शेतमालाच्या गुणवत्तावाढीच्या विविध पद्धती याबाबत मार्गदर्शन केले. शेतकर्‍यांनी उत्पादित केलेल्या मालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी फार्मर प्रोड्युसर कंपनीची भूमिका किती महत्त्वाची आहे, याबाबतही त्यांनी माहिती दिली. तसेच श्रीमती सत्वशीला अवचार यांनी महिला सक्षमीकरण, महिलांनी उद्योग व व्यवसाय क्षेत्रात पुढाकार घेण्याची गरज आणि सामूहिक प्रयत्नातून आर्थिक प्रगती साधण्याबाबत मार्गदर्शन केले. या अभ्यास दौर्‍यामुळे ‘उमेद’ फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या संचालक मंडळातील महिलांना नवीन संकल्पना, आधुनिक तंत्रज्ञान आणि विविध उपक्रम राबविण्याची प्रेरणा मिळाली. आपल्या कंपनीच्या माध्यमातूनही अशाच प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविता येतील, असा विश्वास महिला संचालकांनी व्यक्त केला. या अभ्यास दौर्‍याचे आयोजन स्टेट बँक ऑफ इंडिया ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (RSETI), बीड तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM), बीड यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. यावेळी एसबीआय आरसेटीचे संचालक धनाजी बोईले सर, फार्मर प्रोड्युसर कंपनीचे व्यवस्थापक हितेन कुरे सर, डीएमएम (MSRLM) बीड आशा पवार मॅडम, एफएससी समन्वयक कैलास कांबळे सर आदी मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले. अभ्यास दौर्‍याच्या यशस्वी आयोजनासाठी आरसेटीचे सुरेश बोचकुरे, आसिफ शेख, सय्यद चांद, संतोष काळेगावकर, शहानवाज पठाण यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच फार्मर प्रोड्युसर कंपनीचे ईश्वर सानप यांनी कंपनीच्या विविध कामकाजाची माहिती देत मार्गदर्शन केले. या अभ्यास दौर्‍यात ‘उमेद’ तसेच महिला आर्थिक विकास महामंडळ, बीड येथील एकूण 14 महिला संचालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. महिला शेतकरी व उद्योजकांना सक्षम करण्याच्या दृष्टीने हा अभ्यास दौरा उपयुक्त ठरला.

COMMENTS