Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

’अंतर्मन बोले तथास्तू’ :  सुखाचा मूलमंत्र

आजचे जग जितके भौतिक सुखाची चव चाखत आहे तितकेच ते तणावग्रस्त होत आहे, त्यावरचा एकच मूलमंत्र सांगणारे’ अंतर्मन बोले तथास्तू’ हे संमोहनतज्ज्ञ डॉ. रा

महेश्‍वर यात्रेनिमित्त कोळपेवाडी भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज
रात्री 9 पर्यंत ऑर्डर घ्या… फक्त जेवण्याच्यावेळीच मास्क काढू द्या; हॉटेल व बार मालकांना सक्त सूचना, कर्मचार्‍यांचे लसीकरण बंधनकारक
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालयामध्ये शिक्षक दिन साजरा

आजचे जग जितके भौतिक सुखाची चव चाखत आहे तितकेच ते तणावग्रस्त होत आहे, त्यावरचा एकच मूलमंत्र सांगणारे’ अंतर्मन बोले तथास्तू’ हे संमोहनतज्ज्ञ डॉ. रामकृष्ण जगताप यांचे पुस्तक म्हणजे आधुनिक सुखाचा बटवा आहे.
  डॉ. रामकृष्ण सोन्याबापू जगताप हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातून संमोहन संदर्भात  मराठी विषयात पीएच.डी. झाले. भारतात ते असे एकमेक अभ्यासक आहेत.सध्या ते प्राथमिक शिक्षक आहेत परंतु त्यांची स्वतःची एक उपचार प्रयोगशाळा आहे.अनेक मनोरुग्ण त्यांच्या उपचारामुळे पूर्ण बरे झाले आहेत. आपणच आपले खरे वैद्य असतो, आपले अंतर्मन त्यादृष्टीने फार महत्वाचे आहे हे सूत्रबद्ध सांगणारे हे छोटे पुस्तक म्हणजे एक मानसशास्त्र आहे. आईच्या भूमिकेतून काही गोष्टी त्यांनी या पुस्तकात सांगितल्या आहेत. जो हा मूलमंत्र जपेल त्याला कोणत्याही प्रकारचा मानसिक आजार होणार नाही. जो मनाने खंबीर असतो त्याला कशाचीच चिंता नसते.असे चिंतनशील असणारे हे32 पृष्ठांचे पुस्तक म्हणजे जीवनाची एक निरोगी शब्द प्रार्थना आहे. या पुस्तकात27 छोटे वस्तूपाठ दिले    आहेत ,त्यांचा वापर केला तर माणूस अत्यंत सुखाचे आयुष्य जगू शकतो. ते लिहितात, या पुस्तकाची उपयुक्तता फक्त रुग्णासाठीच नाही तर सर्वांच्या मानसिकतेत सुधारणा व्हावी, अंतर्मनाच्या शक्तीचा पुरेपूर उपयोग जीवनामध्ये करता यावा, यासाठी मनोविज्ञानाचा चिकित्सक अभ्यास करून हे पुस्तक साकारले आहे.
डॉ. रामकृष्ण जगताप उर्फ डॉ. राज यांनी माईंड प्रोग्राम दिला आहे. बाह्यमन10 टक्के असते तर अंतर्मन90 टक्के असते. अंतर्मन कसे निरोगी ठेवावे यावरील मूलमंत्र हाती देणारे हे पुस्तक आहे. सकारात्मक मन नेहमी निर्मळ राहते. नकारात्मकता ही अंधार दर्शविते तर सकारात्मक दृष्टी प्रकाश देते. ज्याचे मन स्वच्छ तेथे सुख नांदते यथेच्छ! बाहेरची अंधार       गुहा बाहेरच ठेवली पाहिजे. मनातला प्रकाशदिवा प्रज्वलीत ठेवला पाहिजे, हा दिवा जपण्याचे सोपे शब्दसाधन म्हणजे हे पुस्तक आहे. लेखक सेवाभावी आहेत. त्यांच्या मुलाचे लग्न झाले तेव्हा एक हजार वाचकांना त्यांनी हे पुस्तक सस्नेह भेट दिले. लोकांनी समाधानी जीवन जगावे हीच त्यांची तळमळ आहे. प्रकाशक व मुद्रक राज माइंड पावर पब्लिकेशन बेलापूर रोड,श्रीरामपूर येथील क्लिनिकचे स्थळ आहे. केवळ65 रुपये किंमतीचे हे पुस्तक अतिशय सुंदर आहे. ज्याच्या हाती हे पुस्तक ,त्याच्या दारावर सुखाची दस्तक असेच म्हणावे लागेल. डॉ रामकृष्ण जगताप यांनी या पुस्तकाच्या रुपाने जणू सुखाची शिदोरीच हाती दिली आहे, त्याबद्दल त्यांचे मनस्वी धन्यवाद!

COMMENTS