Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काढलेले पेव्हिंग ब्लॉक पुन्हा बसवा ः सरफराज पठाण

जामखेड प्रतिनिधी ः शहरातील बीड रोड कॉर्नर ते मोगलपुरा पोलिस स्टेशन रोडवरील काढलेले पेव्हिंग ब्लाक पुन्हा बसवावेत. तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, ज

विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा उपयोग समाजाच्या भल्यासाठी करावा
जिल्हा तलवारबाजी असोसिएशनच्या अध्यक्षपदी विवेक कोल्हे
सुरेश जोशी यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा गुळ तुला करून साजरा

जामखेड प्रतिनिधी ः शहरातील बीड रोड कॉर्नर ते मोगलपुरा पोलिस स्टेशन रोडवरील काढलेले पेव्हिंग ब्लाक पुन्हा बसवावेत. तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, जामखेड महाविद्यालय, तलाठी कार्यालय, सेतू कार्यालय आदी ठिकाणी जाणार्‍या येणार्‍यांना होणारा अडथळा व त्रास थांबवावा अशा मागणीचे निवेदन शिवसेना जिल्हाउपप्रमुख सरफराज पठाण यांनी नगरपरिषद मुख्याधिकारी अजय साळवे यांना दिले आहे. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख कैलास माने, अल्पसंख्याक जिल्हाप्रमुख मेजर मुश्ताक शेख, अल्पसंख्याक तालूका प्रमुख मोहसीन शेख, शहरप्रमुख देविदास भादलकर, बशीर सय्यद, कृष्णा बूराडे, जीशान सय्यद, सोहेल शेख, तौफिक शेख आदी उपस्थित होते.
सदर ठिकाणी बीड रोड कार्नर ते मोगलपुरा रोडवर 2021 मध्ये नगरपरिषद विकास निधी मधून ब्लॉक बसण्यात आले होते.त्यानंतर सदर रस्ता जानेवारी 2022 पर्यंत व्यवस्थित होता. त्यानंतर बीड रोड कॉर्नर ते पोलिस स्टेशनपर्यंत काँक्रीट रस्ता मंजूर झाला. सदर काँक्रीट रस्ता करतांना साईडचे बसवलेले पेव्हिंग ब्लाक गरज नसतांना काढुन टाकले. नागरिकांनी विचारले असता संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांनी सदर ब्लाक काम झाल्यावर दूकानांपर्यत बसवुन देऊन असे तोडी आश्‍वासन दिले. सदर क्राँक्रिट रस्ता केला मात्र पेव्हिंग ब्लाक बसवले नाही व पेव्हिंग ब्लाक काढतांना जेसीबी मशीनने खोदलेले खड्डे बूजवले नाहीत. याच रोडवरून पोलिस स्टेशन, तलाठी कार्यालय, तहसील कार्यालय, जामखेड महाविद्यालय ,सेतू कार्यालय आदी ठिकाणी जाणारया येणार्‍यांना नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नगरपरिषदने लाखो रुपये खर्च करून बसवलेले व अवघ्या सहा महिन्यांत काढून टाकलेले पेव्हिंग ब्लाक पून्हा बसवण्यात यावेत अशी मागणी निवेदनाद्वारे सरफराज पठाण यांनी केली आहे.

COMMENTS