Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मधुकर सहकारी साखर कारखाना मी खरेदी केला ही अफवाच – खासदार  रक्षा खडसे

जळगाव प्रतिनिधी - मधुकर सहकारी साखर कारखाना सुरू होवून कामगारांना न्याय मिळाला पाहिजे ही आपली प्रामाणिक प्रयत्न आपला आहे. परंतू आपण मधुकर सहकार

उसतोड कामगारांना प्रतिटन सातशे रूपये भाव द्यावा
शारदा शैक्षणिक संकुलात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण उत्साहात
कृष्णा अभिमत विद्यापीठाचा ‘सी-मेट’शी सामंजस्य करार; बायोमेडिकल संशोधनाला मिळणार चालना

जळगाव प्रतिनिधी – मधुकर सहकारी साखर कारखाना सुरू होवून कामगारांना न्याय मिळाला पाहिजे ही आपली प्रामाणिक प्रयत्न आपला आहे. परंतू आपण मधुकर सहकारी साखर कारखाना आपण खरेदी केला ही निव्वळ अफवा आहे. ‘मसाका’ घेण्याची परीस्थिती नाही आणि घ्यायचाच राहिला असता तर आपण जाहीरपणे समोर येवून ही प्रस्ताव दिला असता. अशी प्रतिक्रीया भाजपाच्या खासदार रक्षा  खडसे यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून थकित वेतन आणि इतर मागण्यांसाठी फैजपूर येथील मसाकाच्या कामागारांनी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. यात झालेल्या अफवेबद्दल आपली प्रतिक्रीया देवून अफवेला पुर्णविराम दिला आहे. 

COMMENTS