Homeताज्या बातम्या

मुंबई विमानतळावरून 5 कोटीचे सोने जप्तराजकीय पदाधिकार्‍यासह पाच जण ताब्यर्चीं

मुंबई : मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात महसूल गुप्तचर संचालनालयाने सोन्याच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई करत पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

तटकरे विरूद्ध रोहित पवार वाद उफाळलावर्षा निवासस्थानाचे उंबरठे कोणी झिजवले ?
कर्जमाफीत शेतकऱ्यांची संतापजनक फसवणूक
उत्तर प्रदेशात वादळी वाऱ्यासह पावसाचे थैमान; भिंती आणि झाडे कोसळून २० जणांचा मृत्यू तर अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत


मुंबई : मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात महसूल गुप्तचर संचालनालयाने सोन्याच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई करत पाच जणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत एका राजकीय पक्षाशी संबंधित कामगार संघटनेच्या पदाधिकार्‍याचाही समावेश असल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. तपास यंत्रणांनी आरोपींकडून सुमारे पाच कोटी रुपयांहून अधिक मूल्याचे सोने आणि इतर संशयित साहित्य जप्त केल्याची माहिती समोर आली आहे.
माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास विमानतळ परिसरातील संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवून असलेल्या अधिकार्‍यांनी काही व्यक्तींना ताब्यात घेतले. त्यानंतर करण्यात आलेल्या तपासणी आणि चौकशीत मोठ्या प्रमाणावर सोने बेकायदेशीररीत्या देशात आणण्याचा प्रकार उघडकीस आल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणात अजित आचरेकर, रोहित कुमार सिंग, संतोष सुभाष, समीमुल्ला शहा, हमीद लेबेरीफखान आणि फलिल मोहम्मद कासिम यांच्यासह संबंधित संशयितांची चौकशी सुरू आहे. प्राथमिक तपासात जप्त सोन्याची किंमत पाच कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे समोर आले आहे. तपास यंत्रणांच्या मते, या प्रकरणामागे केवळ स्थानिक नव्हे तर परदेशातील काही घटकांचेही संबंध असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या व्यवहारांचे आर्थिक धागेदोरे, परदेशातील संपर्क, प्रवासाची माहिती आणि दूरध्वनी संपर्कांचा तपशील तपासला जात आहे.
तस्करीसाठी कोणत्या मार्गांचा वापर करण्यात आला, तसेच या व्यवहारात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेण्यासाठी चौकशी अधिक तीव्र करण्यात आली आहे. तपासातून आणखी काही महत्त्वाची नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये एका प्रमुख राजकीय पक्षाच्या कामगार संघटनेतील पदाधिकार्‍याचा समावेश असल्याने या प्रकरणाची अधिक चर्चा होत आहे. संबंधित व्यक्तीने काही महिन्यांपूर्वी पक्षात प्रवेश केला होता आणि त्यानंतर त्यांच्यावर संघटनात्मक जबाबदारी सोपविण्यात आली होती, अशी माहिती समोर आली आहे. या कारवाईबाबत महसूल गुप्तचर संचालनालयाकडून अद्याप अधिकृत आणि सविस्तर निवेदन जाहीर करण्यात आलेले नसून तपास पूर्ण होईपर्यंत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. सोन्याच्या तस्करीविरोधातील ही अलीकडील काळातील महत्त्वाची कारवाई मानली जात असून, यामुळे तस्करीच्या जाळ्यावर मोठा आघात झाल्याचे मानले जात आहे.

COMMENTS