Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या

कडा प्रतिनिधी- भारत तसा कृषीप्रधान देश पण या कृषिप्रधान  देशांमध्ये सर्वात जास्त आत्महत्या केल्या त्या शेतकर्‍याने त्याला कारण ठरतंय ते सतत पडणा

एफटीआयच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन केली आत्महत्या.
शेजारील महिलेच्‍या तगाद्याला कंटाळून तरुणाची आत्महत्या.
मुलाकडे कोट्यवधींची संपत्ती असूनही भाकरीपोटी दाम्पत्याची आत्महत्या

कडा प्रतिनिधी- भारत तसा कृषीप्रधान देश पण या कृषिप्रधान  देशांमध्ये सर्वात जास्त आत्महत्या केल्या त्या शेतकर्‍याने त्याला कारण ठरतंय ते सतत पडणारा दुष्काळ ,नापिकी, यामुळे शेतामध्ये पीक येईना हाताला रोजगार नाही यामुळे अनेक शेतकरी कर्जबाजारी होत आहेत त्यामुळेच शेतकरी आत्महत्येचा पर्याय निवडताना दिसत आहेत. असाच प्रकार शिराळ ता. आष्टी जि. बीड येथील तरुण शेतकरी उद्धव उर्फ बाळू भिवाजी आजबे (वय-29) या तरुण शेतकर्‍याने कर्जबाजारीपणाला कंटाळून दि.13  रोजी विषारी औषध प्राशन केले होते. त्यांना पुढील उपचारासाठी अहमदनगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यांची तब्बल अकरा दिवस मृत्यूशी झुंज चालू होती अखेर बाराव्या दिवशी त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या मागे आई-वडील ,पत्नी व मुलगी असा परिवार आहे.

COMMENTS