Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सरकारी मदत मिळण्यासाठी सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांचे तहसीलदारांना निवेदन

कर्जत/प्रतिनिधीः कर्जत-जामखेड तालुक्यामध्ये यंदा हवा तसा पाऊस पडला नाही, शिवाय गेल्या महिनाभरात पावसाचा मोठा खंड पडल्याने दुष्काळग्रस्त परिस्थिती

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेच्या जनजागृती चित्ररथाचे उद्घाटन
*तहसिल कार्यालयात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या l पहा LokNews24*
नगर-मनमाड महामार्गावरील भीषण अपघात, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू | DAINIK LOKMANTHAN

कर्जत/प्रतिनिधीः कर्जत-जामखेड तालुक्यामध्ये यंदा हवा तसा पाऊस पडला नाही, शिवाय गेल्या महिनाभरात पावसाचा मोठा खंड पडल्याने दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या शेतातील उभी पिके जळून गेली असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,व सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांनी व शेतकरी बांधवांनी एकत्र येत सरकारची मदत मिळावी. यासाठी कर्जत-जामखेड दोन्ही तालुक्यातील तहसीलदारांना निवेदन दिले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रधानमंत्री पिकविमा योजना अंतर्गत कर्जत जामखेड मतदारसंघात शेतकर्‍यांनी तूर,कापूस,मका,बाजरी, उडीद, मूग व सोयाबीन या पिकांसाठी विमा संरक्षण उतरवले आहे. त्यांना मिड सिझन -र्वींशीीळीूं अंतर्गत 25 टक्के रक्कम पिकविमा संरक्षण म्हणून मिळावी. यासाठी काही दिवसांपूर्वीच आ.रोहित पवार यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन पाठपुरावा केला होता. त्याच अनुषंगाने आता ही रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यात लवकरात लवकर जमा करावी. यासह सध्या पावसाचे प्रमाण खूप कमी असल्याने कोरडा दुष्काळ जाहीर करून जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याची विनंती देखील शेतकर्‍यांनी केली आहे. यासोबतच पिण्याच्या पाण्यासाठी मागील दोन महिन्यापासून अत्यंत बिकट अवस्था असल्याने रोहित पवार यांनी वैयक्तिक पातळीवर टँकर सुरू केले होते. शासनस्तरावर याबाबत ठोस निर्णय घेण्यात यावा. सध्या दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत शेतकरी व कष्टकरी उपलब्ध असलेल्या पाण्याचे सुयोग्य नियोजन करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु महावितरणकडून करण्यात येणार्‍या भारनियमनामुळे त्यांचे नियोजन कोलमडत आहे. त्यामुळे भारनियमन न करता अखंडित वीजपुरवठा सुरू राहावा. अशी विनंती यावेळी दोन्ही तालुक्यातील तहसीलदारांना तहसील कार्यालयात भेटून शेतकरी बांधवांसहित मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांनी उपस्थित राहून निवेदन दिले आहे.

COMMENTS