Homeताज्या बातम्याधर्म

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी न्यायमूर्ती सुब्रमण्यन

नवी दिल्ली :सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती व्ही. रामसुब्रमण्यन यांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. र

देऊळगाव राजा तालुक्यात गुड मॉर्निग पथकाचे तीन तेरा !
New mumbai : महानगरपालिकेचा मनमानी कारभार… नेरूळ झोपडपट्टीवर चालवला बुलडोझर…. | LokNews24
मुख्यमंत्र्यांच्या सभेहून परतताना शिवसैनिकाच्या गाडीने चिमुकलीला उडवले ! | LOK News 24

नवी दिल्ली :सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती व्ही. रामसुब्रमण्यन यांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने नियुक्तीची घोषणा केली. माजी न्यायमूर्ती रामसुब्रमण्यन जून 2023 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून निवृत्त झाले आहेत. अरुण कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ संपल्यावर 1 जून 2024 पासून राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्षपद रिक्त होते. यानंतर एनएचआरसीच्या सदस्या विजया भारती सयानी या आयोगाच्या कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. माजी न्यायमूर्ती रामसुब्रमण्यन यांचा जन्म 30 जून 1958 रोजी झाला आहे. त्यांनी रामकृष्ण मिशनच्या विवेकानंद कॉलेज, चेन्नई येथून रसायनशास्त्रात पदवी घेतली. त्यानंतर मद्रास लॉ कॉलेजमध्ये कायद्याचे शिक्षण घेतले. त्यानंतर 23 सप्टेंबर 2019 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आणि जून 2023 मध्ये ते निवृत्त झाले होते.

COMMENTS