Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

रस्त्याच्या कामासाठी खंडणीची मागणी

अहिल्यानगर : अहिल्यानगर-मनमाड या महामार्गाचे काम करणार्‍या कंत्राटदारांचे बिले काढायचे नाही, जर तुम्ही बिले काढले तर तुमच्याकडे बघुन घेईन, अशी धम

शेतकऱ्यास मारहाण; कुंभेफळ ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंचासह सहा जणांवर गुन्हा दाखल
कर्जतच्या राजकारणात अतिक्रमणावरून महासंग्राम गरिबांचा संसार उद्ध्वस्त होऊ देणार नाही; नगराध्यक्षा रोहिणी गुंड सभापती राम शिंदे विरुद्ध नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष आमनेसामने
पवार विरुद्ध महायुती : राहुरी पोटनिवडणुकीचे चित्र स्पष्ट, कोण मारणार बाजी?
नगर शहरात आशा टॉकीज चौकात खुलेआम अवैधरित्या शस्त्रांची विक्री – Dainik  Lokmanthan | दैनिक लोकमंथन

अहिल्यानगर : अहिल्यानगर-मनमाड या महामार्गाचे काम करणार्‍या कंत्राटदारांचे बिले काढायचे नाही, जर तुम्ही बिले काढले तर तुमच्याकडे बघुन घेईन, अशी धमकी देत भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) प्रकल्प संचालकाला महिन्याला 50 हजार रूपयांची खंडणी मागितल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तिघांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

  अमरिश माणिकराव मानकर (वय 50, मुळ रा. अकोला, हल्ली रा. चिखलठाणा, ता. जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. किरण शिवाजी राऊत (रा. कोल्हार खुर्द, ता. राहाता), संदीप भास्कर भगत (रा. बायपास रस्ता, शेंडी, ता. अहिल्यानगर) व ऍड. हर्षद चावला (पूर्ण नाव माहिती नाही, रा. सावेडी, अहिल्यानगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

COMMENTS