Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जागर स्त्री शक्तीचा नवरात्रौत्सवाची उत्साहात सांगता

स्पर्धेतील विजेत्या महिलांना आमदार आशुतोष काळेंच्या हस्ते बक्षीस वितरण

कोपरगाव ः प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने मंडळाच्या वतीने साजरा करण्यात आलेल्या ‘जागर स्त्री शक्तीचा’ नवरात्र उत्सवाची मोठ्या उत्साहात स

आमदार काळेंच्या निधीतून 84 लाखांच्या कामांना मान्यता
मोबाईलपेक्षा मैदानी खेळांना महत्व द्यावे
पर्यटन विकास आराखड्यात कोपरगावला प्राधान्य द्या

कोपरगाव ः प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने मंडळाच्या वतीने साजरा करण्यात आलेल्या ‘जागर स्त्री शक्तीचा’ नवरात्र उत्सवाची मोठ्या उत्साहात सांगता समारंभ पार पडला असून या नवरात्र उत्सवात घेण्यात आलेल्या वविध स्पर्धेच्या विजेत्या महिलांना मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांच्या उपस्थितीत आ. आशुतोष काळे व त्यांच्या पत्नी जिल्हा बँकेच्या संचालिका सौ. चैतालीताई काळे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले आहे.
 महिलांचा सर्वात आवडता असणारा होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या माध्यमातून यावर्षी ‘बाई पण भारी देवा’ ‘कोण होणार स्मार्ट गृहिणी’ अशा स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेबरोबरच इतर स्पर्धांना देखील महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून होम मिनिस्टर स्पर्धेतील विजेत्यांसाठी प्रथम बक्षीस फ्रीज, द्वितीय बक्षीस एलसीडी टीव्ही व तृतिय बक्षीस तीन बर्नलचा गॅस ठेवण्यात आले होते या बक्षिसांचे वितरण यावेळी करण्यात आले. या स्पर्धेतील विजेते पुढील प्रमाणे. होम मिनिस्टर प्रथम बक्षीस फ्रीज विजेत्या पल्लवी पोटे, द्वितीय आश्‍विनी दामले तर तृतीय मानकरी  सौ. शारदा जाधव ठरल्या आहेत. देवीतीलक स्पर्धा-प्रथम सुचिता वर्मा, द्वितीय-शैला नवलपुरे, तृतीय-सपना जाधव, उत्तेजनार्थ-अर्चना चव्हाण, रांगोळी स्पर्धा- प्रथम किरण दुसाने, द्वितीय सरिता लाहोटी, तृतीय श्रद्धा होन उत्तेजनार्थ आश्‍विनी जाधव, मेहंदी स्पर्धा प्रथम श्‍वेता पंडोरे, द्वितीय राजपरी जाधव, तृतीय राजश्री बागुल, उत्तेजनार्थ तनाज पठाण, गहू पिठापासून देवीचे अलंकार बनविणे प्रथम सुचेता घुमरे, द्वितीय जयश्री हिवाळे, तृतीय सुशीला वाणी, उत्तेजनार्थ रेखा जाधव, गायन स्पर्धा वय गट 7 ते 10 प्रथम-जान्हवी वाणी, द्वितीय- स्वरा जोरी, तृतीय-संस्कृती रेंदळे, रेयांश देव, वय गट 11 ते 15 प्रथम जयदीप काळे, द्वितीय -भूमिका आघाडे, तृतीय चेतन सातपुते, प्रणय ठाकरे, उत्तेजनार्थ रेणुका सूर्यवंशी, खुला गट प्रथम समी बर्डे, द्वतीय प्रियंका लावर, तृतीय आदिती साळवे,दांडिया स्पर्धा जोडी प्रथम हलवाई ग्रुप, द्वितीय गरबा क्वीन, तृतीय प्रियंका-मानसी सारंगधर, उत्तेजनार्थ अनन्या देवकर, निराली देवकर,दांडिया मोठा ग्रुप प्रथम रेणुका ग्रुप, द्वितीय गरबा क्वीन, तृतीय शिवशक्ती ग्रुप, चतुर्थ नवदुर्गा टीचर्स, दांडिया लहान ग्रुप प्रथम द डान्स मेकर्स, द्वितीय नगरपालिका ग्रुप, तृतीय द डान्स रॉकर्स, बेस्ट मेकअप आर्टिस्ट 2023 प्रथम लताई ब्युटी पार्लर,कोपरगाव, द्वितीय -अपेक्षा ब्युटी पार्लर, चासनळी, तृतीय शितल होन, चांदेकसारे, उत्तेजनार्थ द ब्युटी हब, कोपरगाव, वेलकम पार्लर, वैजापूर, फुगडी स्पर्धा प्रथम डॉ. सी.एम. मेहता. कन्या विद्या मंदिर, द्वितीय सरस्वती ग्रुप, तृतीय उषा कवडे व प्रभा तपसे, उत्तेजनार्थ गौतम पब्लिक स्कूल, फुगडी स्पर्धा प्रथम डॉ.सी.एम.मेहता कन्या विद्यामंदिर, द्वितीय सरस्वती ग्रुप, तृतीय उषा कवडे, प्रभा तपसे या विजेत्यांना आ. आशुतोष काळे चैतालीताई काळे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

COMMENTS