Homeताज्या बातम्या

वादळी पावसात सौरऊर्जा संचाचे मोठे नुकसान

नेवासा : हिवरे परिसरात शुक्रवारी (दि. ५ जून) सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतातील सौरऊर्जा संचाचे मोठे नुकसान झाल्याची घटना घडली आह

चाहुल लागलेल्या मान्सूनचे स्वागत! 
मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी नांदेडवर पावसाचा दमदार प्रहार; वादळी वारे, विजांचा कडकडाट अन् शहर अंधारात
शेतकर्‍यांनी सावधगिरी बाळगून पेरणी करावीमुख्यमंत्री फडणवीस: ड्रग्जविरोधी मोहीम तीव्र सुरू


नेवासा : हिवरे परिसरात शुक्रवारी (दि. ५ जून) सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतातील सौरऊर्जा संचाचे मोठे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये सौरऊर्जा संचासह नऊ सौरपट्ट्या पूर्णपणे निकामी झाल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
रोहिणी कैलास केकाण यांच्या मालकीच्या हिवरे येथील गट क्रमांक ६०५ मधील शेतात बोअरवेलसाठी सौरऊर्जा संच बसविण्यात आला होता. शुक्रवारी सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या वादळी पावसाच्या तडाख्यात सीआरआय सोलर कंपनीचा सौरऊर्जा संच आणि त्यावरील नऊ सौरपट्ट्या उद्ध्वस्त झाल्या.
या घटनेमुळे सिंचन व्यवस्थेवर परिणाम झाला असून संबंधित शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त सौरऊर्जा संचाची पाहणी करून तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी रोहिणी केकाण यांनी संबंधित कंपनीकडे केली आहे.  

COMMENTS