Sangamner : पठारावरील वाळूतस्करी काही केल्या थांबेना

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Sangamner : पठारावरील वाळूतस्करी काही केल्या थांबेना

संगमनेर तालुक्याच्या पठारभागाला लागलेले वाळूतस्करीचे ग्रहण काही केल्या सुटण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र पठारभागातून समोर येत आहे. राजकीय व प्रशासकीय

बेपत्ता मुलीच्या आईने केला आत्मदहनाचा प्रयत्न
स्वतःच्या करिअरची जबाबदारी स्वतःच घेणार
*तुमचे आजचे राशीचक्र शुक्रवार, ११ जून २०२१ l पहा LokNews24*

संगमनेर तालुक्याच्या पठारभागाला लागलेले वाळूतस्करीचे ग्रहण काही केल्या सुटण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र पठारभागातून समोर येत आहे. राजकीय व प्रशासकीय आशीर्वादाने तालुक्यात सुरु असलेला वाळूतस्करीचा हा खेळ आता पठारभागासाठी सामान्य झाल्याचे चित्र असून मुळा व कच नदीपात्राकडे जाणारा प्रत्येक रस्ता त्याची साक्ष देत आहे. राजकीय पदाधिकाऱ्यांच्या नावाने चांगभले म्हणत अनेकांनी आता या बिनभांडवली धंद्यात उड्या घेतल्याने  नद्यांचे पात्र दररोज ओरबाडले जात आहे. पठारभागात तर आता यंत्राच्या सहाय्याने तस्करी करणार्‍यांमध्ये एकप्रकारची स्पर्धाच लागली आहे. त्यासाठी अनेकांनी नवेकोरे जेसीबी यंत्रही खरेदी केले असून दिवस राञ बिनधास्तपणे  ट्रॅक्टर, ढंपर, पिक अप च्या सहाय्याने राजरोसपणे वाळु तस्करी केली जात आहे

मंगळवारी दिनांक २८सप्टेंबर रोजी महसूल पथकाने थेट मुळानदी पाञात जात जेसीबी यंत्रासह दोन ट्रॅक्टर वाळु उपसा करत असताना या पथकाला आढळून आले पथकाने ही वाहणे पोलिस स्टेशनला घेऊन चला असे सांगीतले परंतु ऐकतील ते वाळु तस्कर कसले मग या पथकाने घारगांव पोलिसांची मदत घेऊन ही वाहणे पुढे घालुन पाठीमागे पोलीस गाडी अश्या पद्धतीने घारगांव बस स्थानक परीसरातून नेली व घारगांव पोलिस स्टेशनला ही वाहणे जमा करुन ताबा पावती केली वास्तविक पाहता या कारवाईत वाळू तस्करांवर गुन्हे दाखल होणे अपेक्षीत होते माञ तसे न होता या वाहणांवर महसुली दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती समजते परंतु हा दंड कीती आकारला जातो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे अशी चर्चा घारगांव परीसरात चर्चिली जात आहे.

COMMENTS