कर्जत पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागात गैरहजर अधिकारी-कर्मचाऱ्यांमुळे शेतकऱ्यांचा खोळंबा

Homeताज्या बातम्याअहमदनगर

कर्जत पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागात गैरहजर अधिकारी-कर्मचाऱ्यांमुळे शेतकऱ्यांचा खोळंबा

कर्जत (प्रतिनिधी) – कर्जत पंचायत समिती अंतर्गत असलेल्या पशुसंवर्धन विभागात कार्यालयीन वेळेमध्ये एकही अधिकारी अथवा कर्मचारी उपस्थित नसल्याची गंभीर

एकही पात्र लाडकी बहिण योजनेपासून वंचित राहणार नाही
शुभम थोरातला एमबीबीएस पदवी  
नालेगावमध्ये संत गोरोबा काका समाधी सोहळा उत्साहात   

कर्जत (प्रतिनिधी) – कर्जत पंचायत समिती अंतर्गत असलेल्या पशुसंवर्धन विभागात कार्यालयीन वेळेमध्ये एकही अधिकारी अथवा कर्मचारी उपस्थित नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यामुळे तालुक्यातील विविध गावांमधून आपल्या कामासाठी आलेल्या शेतकऱ्यांना निराश होऊन परत जावे लागले.

शासकीय कार्यालयात कार्यालयीन वेळेत अधिकारी व कर्मचारी हजर असणे हे मूलभूत कर्तव्य असताना, या विभागात शुकशुकाट दिसून आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली. अनेक शेतकरी आपल्या विविध कामांसाठी आणि माहितीसाठी किंवा इतर आवश्यक कामांसाठी येथे आले होते. मात्र, कार्यालयामध्ये कुणीही हजर नसल्याने त्यांची फरपट झाली. बराच वेळ त्यांना ताटकळत थांबावे लागले होते.

या प्रकारामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडून कोणतीही कारवाई केली जाणार का? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

नियमानुसार, शासकीय कार्यालयात अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती नोंदवली जाणे आवश्यक असून, अशी हलगर्जी नागरिकांच्या सेवेला अन्यायकारक ठरत आहे. प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन संबंधित जबाबदारांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी तालुक्यातील नागरिक, शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.
सोबत फोटो आहे

COMMENTS