Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मविआत सांगलीच्या जागेवरून रस्सीखेच

विशाल पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम

सांगली : महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवरून चांगलीच रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे. तीन दिवस ठाकरे गटाचे नेते संजय राऊत सांगलीमध्ये तळ

बियाणे, खाते खरेदी करताना शेतक-यांनी दक्षता घ्यावी
रूपाली बोराडे पाटील यांना बेस्ट ड्रेस डिझायनर अवार्ड
रेल्वेच्या 85 हजार कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी

सांगली : महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवरून चांगलीच रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे. तीन दिवस ठाकरे गटाचे नेते संजय राऊत सांगलीमध्ये तळ ठोकून बसले होते, मात्र सोमवारी काँगे्रस नेते विशाल पाटील यांनी पत्रकार परिषद घेत सांगलीच्या घराघरामध्ये काँगे्रस असून ही जागा आम्हीच लढवणार असल्याचा पवित्रा घेतला आहे, त्यामुळे सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये तणाव आणखीनच वाढतांना दिसून येत आहे. सांगलीच्या जागेवरून 16 वेळा काँगे्रसचा खासदार निवडून आलेला आहे, त्यामुळे काँगे्रसने ही जागा प्रतिष्ठेची केली आहे.
सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून महाविकास आघाडीमध्ये मोठा तिढा निर्माण झाला आहे. सांगलीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, हा काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ असून इथून काँग्रेसच निवडणूक लढवेल असे स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे. त्यासाठी विशाल पाटील यांचे नाव एकमताने काँग्रेस पक्षश्रेष्ठींना सुचवण्यात आले आहे, असे असले तरी ठाकरेंची शिवसेना ही जागा लढण्यावर ठाम आहे. या पार्श्‍वभूमीवर विशाल पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. सांगलीत उमेदवारीचा कोणताही तिढा नव्हता. तो अनपेक्षितपणे निर्माण झाला. सांगली काँग्रेसने एकमताने माझे नाव उमेदवारीसाठी पाठवले होते. आम्ही ही जागा लढण्यावर आजही ठाम आहोत. विश्‍वजीत कदम हे त्यासाठी प्रयत्न करत आहेत. उद्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वरिष्ठ निर्णय घेतील आणि हा निर्णय आमच्याच बाजूने लागेल, असे विशाल पाटील म्हणाले. संजय राऊत हे पुरोगामी नेतृत्वाचा आवाज आहेत. त्यांच्याबद्दल आम्हाला प्रचंड आदर आहे. ते भाजपच्या विरोधात बोलतात, त्यामुळे आम्हालाही ऊर्जा मिळते. मात्र, आता त्यांचा आवाज सांगलीच्या विरोधात जात आहे, अशी खंत विशाल पाटील यांनी व्यक्त केली. संजय राऊत यांनी विश्‍वजीत कदम यांच्याबद्दल प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे काही विधाने केली. विश्‍वजीत कदम हे सांगली लोकसभेच्या जागेसाठी बाजू मांडत होते. अशावेळी त्यांच्याबद्दल संशयास्पद वक्तव्ये करणे हे आघाडी धर्माला शोभणारे नाही, असेही विशाल पाटील म्हणाले. सांगलीच्या उमेदवारीचा विषय बंद खोलीत व्हायला हवा होता. तो बाहेर आला. त्यामुळे विश्‍वजीत कदम यांनी त्यावर मत मांडले. ही जागा आमची आहे असे ते म्हणाले. वैयक्तिक पातळीवर आम्ही कधीच काही केले नाही. मात्र रोजच्या रोज हा मुद्दा विनाकारण ताणला गेला, असे विशाल पाटील म्हणाले. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सांगलीच्या उमेदवारीचा निर्णय होईल. मात्र हा निर्णय होण्याआधी राऊत साहेब तीन-तीन दिवस सांगलीत का येत आहेत? राज्यात लोकसभा निवडणूक सुरू आहे. राऊत साहेबांना देशभरातून भाषणांसाठी मागणी आहे. मग ते सांगलीत वेळ का वाया घालवत आहेत?, असा सवाल विशाल पाटील यांनी केला.

शिवसेनेने सांगलीचीच जागा का मागितली? – देशात लोकसभेच्या 17 निवडणुका झाल्या आहेत. त्यापैकी 16 वेळा सांगलीची जागा काँग्रेसने जिंकली हा एक विक्रम आहे. शिवसेनेला पश्‍चिम महाराष्ट्रात जागा हवी होती तर त्यांनी कोल्हापूर, सोलापूर, पुणे, सातारा यापैकी एखादी जागा का मागितली नाही? सांगलीच का मागितली? हे कोडे काही मला कळत नाही, असेही विशाल पाटील म्हणाले.

आज होणार फैसला – सांगलीच्या जागेचा तिढा काँगे्रसच्या हायकमांडच्या दरबारात असून, काँगे्रस या जागेसंदर्भात आज मंगळवारी निर्णय घेणार आहेत. जर काँगे्रसने ही जागा ठाकरे गटाला सोडल्यास सांगलीतील काँगे्रस कार्यकर्ते काय निर्णय घेतात, यावर पुढील राजकीय गणित अवलंबून असणार आहे.

COMMENTS