Homeताज्या बातम्या

सहा तास भारनियमन; वीजबिल मात्र ४२ हजारशेवगावमधील प्रकार ; नागरिकांत संतापाचे वातावरण

शेवगाव : महावितरणच्या आंधळ्या कारभाराचा एक नमुना पुढे आला असून दिवसभरात ६ तास भारनियमन असताना आणि पुन्हा चार तास वीज गायब असताना घरगुती ग्राहकाला महिन्याचे तब्बल ४२ हजार रुपयांचे बिल पाठवण्याचा पराक्रम महावितरणने केला आहे.शेवगाव तालुक्यातील ग्राहक बाबासाहेब गर्जे यांना (रा. नजिक बाभुळगाव) महावितरणे जून महिन्याचे तब्बल ४२ हजार रुपये बिल पाठवले आहे. विशेष म्हणजे त्यांच्या गावात मार्च २०२६ पासून म्हणजेच गेल्या चार महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात भारनियमन सुरु आहे. सुरवातीला सायंकाळी ६ ते रात्री ९ यादरम्यान तीन तासांचे भारनियमन सुरु होते. यामध्ये दुप्पट वेळेची वाढ करुन सायंकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत त्यात वाढ केली. म्हणजे रात्री ऐन वापराच्या वेळेस वीज बंद असते. शिवाय दिवसभरातही दोन-दोन, तीन-तीन तास कधी तर दिवसभर वीज गायब असते. त्यामुळे गेली तीन महिने या गावातील नागरिकांना उकाड्याचाही प्रचंड त्रास सहन करावा लागला. याबाबत आंदोलन करुनही महावितरणच्या भोंगळ कारभारात कोणतीही सुधारणा झाली आहे. आता संतापजनक बाब म्हणजे चोवीस तासांपैकी ६ तास सक्तीचे भारनियमन आणि चार-पाच तास विजेचा लपंडाव असताना बील मात्र सरासरी एक हजार रुपयांवरुन थेट ४२ हजार रुपयांवर गेले आहे. ग्राहकांसाठी ही बाब अत्यंत मनस्ताप देणारी असून याबाबत अंतर्गत ग्राहक तक्रार निवारण मंचात तक्रार दाखल करणार असल्याचे ग्राहक बाबासाहेब गर्जे यांनी सांगितले.महावितरण कंपनीचे शेवगाव उपविभागाचे तत्कालीन अभियंता यांच्या कारभाराबाबत ग्राहकांच्या अनेक तक्रारी होत्या. त्यांची सध्या बदली झाली आहे. आता आलेले अव्वाच्या सव्वा बील हे सुद्धा त्यांच्याच भोंगळ कार्यकाळाचे उदाहरण आहे. त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे.’’ – बाबासाहेब गर्जे (वीज ग्राहक)

लोडशेडिंग विरोधात संगमनेरात काँग्रेस आक्रमकमहावितरण कार्यालयावर संगमनेरातील नागरिकांचा संतप्त मोर्चा
महावितरणच्या केज ग्रामीण-1 शाखेचे कनिष्ठ अभियंता म्हणून श्री.देवा पवार यांनी स्वीकारला पदभारनुकतेच नव्याने रुजू झालेले कनिष्ठ अभियंता यांचा स्वाभिमानी पत्रकार संघाच्या वतीने सत्कार संपन्न
खंडित वीजपुरवठ्यामुळे तरोडावासीय हैराण; नागरिकांचा संताप वाढला
Mahavitaran Hike price of Electricity before diwali check here revised rate  | महाराष्ट्र बातम्या - News18 Marathi

COMMENTS