Homeताज्या बातम्यासंपादकीय

कर्जबुडवे आणि हिंडेनबर्ग अहवाल

अमेरिकास्थित हिंडेनबर्ग अहवाल सध्या मोेठया प्रमाणावर चर्चेत आहे. मात्र हिंडेनबर्ग ऐवजी भारतीलच गुंतवणुकीसंदर्भातील काही संस्थांनी दिवाळखोरीत जाण

कॉलेजियम पद्धत आणि संभ्रम
राजीनामासत्र आणि सरकारचा दबाव
महाविकास आघाडीतील फूट ?

अमेरिकास्थित हिंडेनबर्ग अहवाल सध्या मोेठया प्रमाणावर चर्चेत आहे. मात्र हिंडेनबर्ग ऐवजी भारतीलच गुंतवणुकीसंदर्भातील काही संस्थांनी दिवाळखोरीत जाणार्‍या, गुंतवणूकदारांची फसवणूक करणार्‍या किंवा चुकीचे उद्योग करून, नफा मिळवणार्‍या कंपन्यांचे पर्दाफाश करण्याची गरज आहे. मात्र केंद्राचा वरदहस्त असल्यामुळे अशा अनेक कंपन्यांची चौकशी होत नाही. चुकीचे होत असल्याचे माहीत असूनही, कुणी समोर येत नाही. अशावेळी हिंडेनबर्ग अहवाल महत्वाचा ठरतो. देशामध्ये कोटयावधींचे कर्ज बँकांनी उद्योगपतींना दिले आहे. त्यातील काही उद्योगपती आपली पत राखत वेळेवर पैसे भरतात, तर काही उद्योगपती परदेशात पळ काढल्याचे संपूर्ण भारतीयांनी बघितले आहे. बँकांचे हजारो रुपये फेडू न शकल्यामुळे शेतकरी बांधव आत्महत्या करतांना दिसून येतात. मात्र त्याचबरोबर कोटयवधींचे कर्ज घेतलेले उद्योगपती कर्ज मोठया प्रमाणावर झाल्यास परदेशात पळ काढल्याचे उदाहरण कमी नाही. भारतीय स्टेट बँकेच्या नेतृत्वाखाली 17 बँकांनी विजय मल्ल्याच्या किंगफिशर एअरलाइन्ससाठी कर्जपुरवठा केला होता. कर्जाचे मुद्दल व त्यावर चढलेले व्याज असे एकूण 7 हजार 800 कोटी रुपये मल्ल्याकडे थकित आहेत.त्यानंतर मल्ल्या परदेशात फरार झाला. मल्ल्यासारखे अनेक उद्योगपती कर्ज बुडवून फरार झाले आहेत. कर्जबुडव्याबद्दल सांगायचे कारण म्हणजे अमेरिकास्थित हिंडेनबर्ग संशोधन संस्थेचा आलेला अहवाल होय. विशेष म्हणजे हा अहवाल अमेरिका संशोधन संस्थेने जाहीर केला आहे.

आणि तो अदानी समूहाने दिलेल्या माहितीच्या आधारावर तयार केलेला आहे, हे विशेष. असे असतांना या संशोधनांसंबंधी शंका घेेणे म्हणजे, अदानी समूहाला पाठीशी घालणे होय. देशामध्ये कोरोनाच्या काळामध्ये अनेक जागतिक कंपन्यांचे दिवाळे निघत असतांना, भारतीय कंपन्यांनी मात्र मोठी संपत्ती कमावल्याचे दिसून येत आहे. अदानी समूहासंबंधित केलेल्या संशोधनानंतर अदानी समूहाचे शेअर बाजार धाडकन कोसळले होते. त्यामुळे या संशोधनांची चर्चा होतांना दिसून येत आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून अदानी समूह हा कोटयवधी रुपयांचे उड्डाने घेतांना दिसून येत आहे. जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत ते दुसर्‍या क्रमांकांवर पोहचले होते. मात्र हिंडेनबर्ग संशोधन अहवालानंतर अदानी समूहाचे शेअर्स कोसळले आणि त्यांचे तब्बल 4.2 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. हिंडेनबर्ग अहवालाला अदानी समूहाने 413 पानांचे उत्तर दिले आहे. त्यात म्हटले आहे की, कंपनीवर करण्यात आलेले आरोप खोटे असून अमेरिकेतील कंपन्यांना फायदा व्हावा यासाठी हा अहवाल तयार करण्यात आला आहे’ असं अदाणींनी आपल्या उत्तरात म्हटलं आहे. तसेच, ‘भारताची स्वतंत्रता, अखंडता, गुणवत्ता आणि विकासावर हा हल्ला आहे. अशा विश्‍वासार्ह आणि नैतिकता नसलेल्या संस्थेच्या अहवालामुळे आमच्या गुंतवणुकीवर परिणाम झाला आहे’, असे म्हटले आहे. मात्र अदानी समूहाने या आपल्या उत्तरात हिंडेनबर्ग अहवालाचे कोणतेही आरोप पुराव्यानिशी खोडून काढलेले नाही. किंवा त्यांच्या आरोपांना थेट उत्तर देणे टाळले आहे. याऐवजी त्यांनी भारताची स्वतंत्रता, अखंडता आणि गुणवत्ता असे शब्द वापरून आपल्यावरील आरोपावर राष्ट्रवादाचा मुलामा चढवण्याचा एकप्रकारे प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे संपत्ती असो की, उद्योगक्षेत्र त्याला एक नियम नक्कीच लागू पडतो. तुम्ही ज्याप्रकारे वेगवान प्रगती करता, ती तितक्याच वेगाने खाली येते. याउलट तुम्ही एक-एक पायरी जेव्हा चढत जाता, तेव्हा तुमचा उद्योग असो की, संपत्ती ती नेहमीच शाश्‍वत असते. त्यामुळे कोटयावधींचे उड्डाणे घेणार्‍या कंपन्या ज्या वेगाने वर जातील तितक्याच वेगाने त्या खाली येतील, हा निसर्गाचा नियम त्यांना देखील लागू पडतो, मग तो अदानी समूह असो की, आणखी कुणी.

COMMENTS