बीड : विशेष सघन पुनरावलोकन (एसआयआर) प्रक्रियेदरम्यान मतदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असताना, बीएलओ म्हणून कार्यरत प्रभाकर उंबरे, चेतन धु

बीड : विशेष सघन पुनरावलोकन (एसआयआर) प्रक्रियेदरम्यान मतदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असताना, बीएलओ म्हणून कार्यरत प्रभाकर उंबरे, चेतन धुरंधरे आणि रमण कुलकर्णी यांनी आपल्या कर्तव्यदक्ष व लोकाभिमुख कामगिरीमुळे ही प्रक्रिया नागरिकांसाठी सुलभ केली आहे, असे मत मुक्त पत्रकार एस. एम. युसूफ आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक रमेशराव गंगाधरे यांनी व्यक्त केले.
यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, या तिन्ही बीएलओंनी आपल्या कर्तव्यात कोणतीही कसूर न करता अत्यंत जबाबदारीने काम केले आहे. एसआयआर प्रक्रियेदरम्यान मतदारांनी दिवस-रात्र कोणत्याही वेळी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून माहिती विचारली तरी त्यांनी कोणतीही चिडचिड किंवा वैताग न करता संयमाने व नम्रपणे आवश्यक मार्गदर्शन केले. प्रक्रियेतील आवश्यक कागदपत्रे, अर्ज भरणे, शंका निरसन आणि नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासंदर्भातील प्रत्येक बाबीची माहिती त्यांनी अत्यंत सहकार्याच्या भावनेने दिल्यामुळे अनेक मतदारांची गैरसोय टळली. विशेष म्हणजे, यापूर्वी परिचय नसलेल्या अनेक नागरिकांशीही त्यांनी आपुलकीचे संबंध निर्माण करत विश्वास संपादन केला. एसआयआर प्रक्रिया शंभर टक्के अचूक पार पडावी आणि एकही पात्र मतदार मतदार यादीतून वंचित राहू नये, या उद्देशाने प्रभाकर उंबरे, चेतन धुरंधरे आणि रमण कुलकर्णी हे तिन्ही बीएलओ अहोरात्र परिश्रम घेत असल्याने मतदारांची डोकेदुखी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे, असेही एस. एम. युसूफ आणि रमेशराव गंगाधरे यांनी नमूद केले.

COMMENTS