Homeताज्या बातम्या

तिरंग्याच्या सन्मानासाठी गेवराईत 13 ऑगस्टला भव्य ‘हर घर तिरंगा’ रॅली

गेवराई : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रध्वजाबद्दल अभिमान आणि देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी भारतीय जनता पार्टी, गेवराई वि

नीट प्रकरणावरून मुंबईत २६ जुलैला मोर्चाची हाक; विद्यार्थी-पालकांनी सहभागी होण्याचे ठाकरे बंधूंचे आवाहन
शहीद जवानांचा पराक्रम भारतीयांना सदैव प्रेरणा देत राहील; ज्ञानसागर गुरुकुलमध्ये कारगिल विजय दिन उत्साहात साजरा
राजधानीत ई-20 इंधन धोरणाविरोधात आम आदमी पार्टीचा मोर्चा; अरविंद केजरीवालांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन

गेवराई : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रध्वजाबद्दल अभिमान आणि देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी भारतीय जनता पार्टी, गेवराई विधानसभा मतदारसंघाच्या वतीने गुरुवार, दि. 13 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता गेवराई शहरात भव्य ‘हर घर तिरंगा’ रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही रॅली उत्साहात काढण्यात येणार आहे.

या रॅलीस माजी राज्यमंत्री तथा भाजपा नेते बदामराव पंडित, भाजपा जिल्हाध्यक्ष शंकरराव देशमुख, भाजपा नेते बाळराजे पवार, माजी सभापती तथा भाजपा नेते युधाजीत पंडित, युवा नेते यशराज पंडित, युवा नेते शिवराज पवार, युवा नेते रोहित पंडित यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

‘हर घर तिरंगा’ रॅलीची सुरुवात गेवराई शहरातील लोकनेते बदामराव पंडित यांच्या निवासस्थानापासून होणार आहे. शहरातील प्रमुख मार्गावरून ही रॅली मार्गक्रमण करीत शास्त्री चौक येथे समारोप करण्यात येणार आहे. रॅलीदरम्यान राष्ट्रध्वजाचा सन्मान राखत देशभक्तीपर वातावरण निर्माण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. रॅलीच्या समारोपप्रसंगी मंत्री पंकजाताई मुंडे या उपस्थित युवक व नागरिकांशी संवाद साधणार आहेत. राष्ट्रध्वजाचे महत्त्व, स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास, देशाप्रती नागरिकांची जबाबदारी तसेच राष्ट्रप्रेमाची भावना याबाबत त्या मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे गेवराई शहरातील युवकांमध्ये या रॅलीबाबत विशेष उत्साहाचे वातावरण आहे.

या रॅलीच्या आयोजनासाठी संयोजक यशराज पंडित व शिवराज पवार यांच्यासह भाजपा विधानसभा समन्वयक श्रीकांत सानप, मंडळ अध्यक्ष उध्दव रासकर, सचिन दाभाडे, राजेश पवार तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. स्वातंत्र्यदिन हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा दिवस असून राष्ट्रध्वजाचा सन्मान करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून देशभक्तीची भावना घराघरात पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. गेवराई शहरातील नागरिक, युवक, महिला तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या भव्य रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन बदामराव पंडित, बाळराजे पवार, यशराज पंडित तसेच भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS