कृषी पंपाचे विद्युत कनेक्शन तोडण्याची मोहिम थांबवावी

Homeमहाराष्ट्रसातारा

कृषी पंपाचे विद्युत कनेक्शन तोडण्याची मोहिम थांबवावी

विद्युत विभागाकडून कृषी पंपाचे विद्युत कनेक्शन तोडण्याची चालू असलेली मोहिम त्वरित थांबविण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय बंजारा युवा सेना यांच्या वतीने महावितरण आणि तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनातून केली आहे.

अभिनेते भारत गणेशपुरे यांना मातृशोक
माझ्या नवऱ्याची बायको’ मालिका आता हिंदीत
देशी बनावटीचे पिस्तूल खरेदी-विक्रीच्या रॅकेटचा पर्दाफाश; विकणार्‍यासह खरेदी करणारे सातारा जिल्ह्यातील तिघे अटकेत

अखिल भारतीय बंजारा युवा सेनेचे खंडाळा येथे निवेदन

लोणंद / वार्ताहर : विद्युत विभागाकडून कृषी पंपाचे विद्युत कनेक्शन तोडण्याची चालू असलेली मोहिम त्वरित थांबविण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय बंजारा युवा सेना यांच्या वतीने महावितरण आणि तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनातून केली आहे. यावेळी निवेदन देताना अखिल भारतीय बंजारा युवा सेना सातारा जिल्हा सचिव नितिन पवार, किशोर भोसले, सतिश जाधव, सुनिल दुधाणे, अक्षय सुतार यावेळी उपस्थित होते.

दिलेल्या निवेदनात असे म्हटलेले आहे की, खंडाळा तालुक्यातील विद्युत विभागाची योजना चांगल्याप्रकारे आहे. विद्युत विभागाचे कृषी पंपाचे विद्युत कनेक्शन तोडण्याचे चालू असलेल्या मोहिमेमुळे शेतकर्‍यांचे रोष शासनावर होत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचा कनेक्शन न थोडता चालू बिले भरण्यासाठी दि. 1/6/2021 ही तारीख निश्‍चित करून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा.

खंडाळा तालुक्यातील सर्व शेतकर्‍यांना प्रत्येक महिन्याचे विद्युत बिल हे एचपी पंपानुसार आकारले जाते. शेतकरी वर्षातून 1 ते 2 हंगामाच्या वेळी विद्युत वाहिनीचा वापर करतात. खंडाळा तालुक्यातील पूर्णपणे विद्युत वाहिनी करणारे शेतकरी खूप कमी वीज वापरतात.त्या अनुषंगाने वार्षिक बिल एचपी पंपानुसार न घेता आलेल्या बिलाबद्दल पुनर्विचार करावा. कोरोना सारख्या महामारीमुळे शेतकरी खूप त्रस्त आहे. जगाच्या पोशिंद्याला थोडी मुदतवाढ देऊन दिलासा द्यावा, अशी विनंती करण्यात आली आहे.

COMMENTS