शेवगाव : शेवगाव शहरातील खालची वेस परिसरातील श्री पावन मारुती मंदिर येथे भव्य श्री चैतन्य नवनाथ महाराज संगीतमय कथेचे आयोजन करण्यात आले आहे. श्री प
शेवगाव : शेवगाव शहरातील खालची वेस परिसरातील श्री पावन मारुती मंदिर येथे भव्य श्री चैतन्य नवनाथ महाराज संगीतमय कथेचे आयोजन करण्यात आले आहे. श्री पावन मारुती मंदिर ट्रस्ट व शहीद भगतसिंग मित्र मंडळ, खालची वेस यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. २९ मे ते ५ जून २०२६ या कालावधीत हा धार्मिक व आध्यात्मिक सोहळा पार पडणार आहे.
या कथामालेचे कथाव्याख्याते म्हणून सुप्रसिद्ध रामायणाचार्य ह.भ.प. गणेश महाराज कुदळे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रम दररोज रात्री ८ ते १० या वेळेत होणार असून, नवनाथ परंपरेतील विविध प्रसंगांचे संगीतमय निरूपण केले जाणार आहे.
कथामालेदरम्यान गोरक्षनाथ, कानिफनाथ, मच्छिंद्रनाथ, श्री मारुती युद्ध, नवनाथांच्या समाधी स्थळांसह विविध आध्यात्मिक विषयांवर कथानिरूपण होईल. तसेच शुक्रवार, दि. ५ जून रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत काल्याचे कीर्तन, संतसेवा व महाप्रसाद वाटपाने या सोहळ्याची सांगता होईल. या धार्मिक सोहळ्यानिमित्त महाप्रसादाचे आयोजन आशा रामेश्वर धूत परिवारातर्फे करण्यात आले आहे, तर भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जय भोलेनाथ अँड दीपक गवाडे यांनी केली आहे. तरी परिसरातील भाविकांनी या श्रवणसुखाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

COMMENTS