Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नामांतर नव्हे, विकासाची गरज ओळखा! जामखेड तालुक्याच्या नामांतराच्या मागणीनंतर नागरिकांचा सूर

जामखेड : सध्या शहरे, गावे आणि विविध संस्थांच्या नामांतराचा विषय देशभर चर्चेत आहे. अहमदनगरचे ‘अहिल्यानगर’ असे नामकरण झाल्यानंतर आता जामखेड तालुक्

शेवगावात अन्नभेसळविरोधी धडक कारवाई; दूध डेअरींवरील पदार्थांचे नमुने जप्त विक्रेत्यांत खळबळ
शेवगावात अन्नभेसळविरोधी धडक कारवाई; दूध डेअरींवरील पदार्थांचे नमुने जप्त, विक्रेत्यांत खळबळ
वीजप्रश्न आंदोलनातील मोर्चेकरी १६ वर्षानंतर निर्दोष  
जामखेड विकास आराखडा नेमका कोणासाठी ? – Dainik Lokmanthan | दैनिक लोकमंथन

जामखेड : सध्या शहरे, गावे आणि विविध संस्थांच्या नामांतराचा विषय देशभर चर्चेत आहे. अहमदनगरचे ‘अहिल्यानगर’ असे नामकरण झाल्यानंतर आता जामखेड तालुक्यालाही अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची मागणी पुढे आली आहे. ‘जनजागरण युवा मंच’ या संघटनेच्या वतीने जामखेड तालुका तसेच नगरपरिषदेचे नामकरण अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने करण्यासाठी उपोषणही करण्यात आले. मात्र, नामांतरामुळे खरोखरच विकासाला चालना मिळणार का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

शहर, गाव किंवा संस्थेचे नाव बदलल्याने तेथील पायाभूत सुविधा, रोजगारनिर्मिती, शिक्षण, आरोग्य, उद्योग किंवा नागरिकांचे राहणीमान यात थेट बदल होण्याची शक्यता कमी असल्याचे मत व्यक्त होत आहे. नामांतर ही अस्मिता, इतिहास आणि सामाजिक न्यायाशी संबंधित प्रक्रिया असली, तरी नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्न सोडविण्यासाठी प्रत्यक्ष विकासाची आवश्यकता अधिक असल्याचे बोलले जात आहे.

जामखेड शहर आणि तालुक्यात पिण्याचे पाणी, अखंड वीजपुरवठा, दर्जेदार रस्ते, सांडपाणी व्यवस्थापन, रोजगारनिर्मिती, शासकीय योजनांचा लाभ, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन आणि नागरिकांची कामे वेळेत होणे या मूलभूत प्रश्नांकडे अधिक लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. केवळ नामांतराच्या मागण्या करण्यापेक्षा या प्रश्नांवर शासन आणि प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा होणे आवश्यक असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.

अहिल्यादेवी होळकर यांच्या न्यायप्रिय, पारदर्शी आणि सर्वसमावेशक कारभाराचा आदर्श आजही राज्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी मानला जातो. मात्र, त्यांच्या नावाचा गौरव करताना त्यांच्या विचारांनुसार लोकाभिमुख आणि विकासाभिमुख कामे होणेही तेवढेच महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. शहराचे नाव बदलले तरी नागरिकांचे उत्पन्न, जीवनमान आणि मूलभूत सुविधा सुधारल्या नाहीत, तर विकास अपूर्णच राहतो. त्यामुळे नामांतराच्या चर्चेबरोबरच सर्वसमावेशक विकासाच्या मुद्द्यांवरही गांभीर्याने विचार होण्याची आवश्यकता असल्याचे मत विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.

COMMENTS