Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आ. रोहित पवारांनी विविध केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेतल्या

मतदारसंघातील पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात निर्माण आणि नुतनीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करणे आवश्यक आहे. त्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र

कल्याण -विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर एकाच रात्रीतुन ६ वाहने पलटी
अहमदनगर मध्ये एसटी चालकाची गळफास घेऊनआत्महत्या (Video)
खरवंडी कासार परिसरातील विविध प्रश्नाबाबत आंदोलन करणार – अंकुश कासुळे

मतदारसंघातील पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात निर्माण आणि नुतनीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करणे आवश्यक आहे. त्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र शेखावत, 
तसेच केंद्रीय दळणवळण, रेल्वे आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या आ रोहित पवार यांनी भेटी घेऊन मतदार संघातील त्यांच्या खात्यांतर्गत असलेल्या प्रलंबित व नवीन कामांच्या मंजुरी बाबत सविस्तर चर्चा केली. रस्त्यासह अनेक कामे लवकरच मार्गी लागतील. मतदारसंघातून जाणारा पैठण ते पंढरपूर या पालखी मार्गाचे खर्डा ते कुर्डूवाडी यादरम्यान रखडलेले ११४ कि. मी चे काम जलदगतीने सुरु करणे आवश्यक आहे. संत एकनाथ महाराज, संत भगवान बाबा, संत गीतेबाबा, संत गोरोबा कुंभार यांसारख्या प्रख्यात संतांच्या पालख्या आणि लाखो यात्रेकरूंसह अनेक दिंड्या या मार्गाने पंढरपूरला जात असतात. त्यासाठी पुरेसा निधी देण्याची मागणी यावेळी नीतीन गडकरी यांच्याकडे केली.सोबतच श्रीगोंदा ते जामखेड राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८ ड याचे पुनर्निर्माण आणि नुतनीकरण आणि अहमदनगर- सोलापूर यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग, करमाळा मतदारसंघातील जातेगाव ते टेंभुर्णी हा रस्ता NHAI कडे हस्तांतरित विषयी आदींबबतक चर्चा केली. या रस्त्यांच्या कामाला मंजुरी मिळाली असून या  कामाच्या निविदा पूर्ण झाल्या आहेत. या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन करण्यासाठी वेळ देण्याची विनंती आमदार रोहित पवार यांनी नीतीन गडकरी यांना केली.यावेळी केंद्रीयमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना खर्डा किल्ल्यात उभारण्यात येणाऱ्या ‘स्वराज्य ध्वजा’च्या कार्यक्रमाचं निमंत्रण दिले, दसऱ्याच्या दिवशी  प्रत्यक्ष उपस्थित राहू शकलो नाही तरी व्हिडीओ व अन्य माध्यमातून कार्यक्रमासाठी शुभेच्छा पाठवेल असे ज्योतिरादित्य सिंधियाजी यांनी यावेळी सांगितले.

COMMENTS