भारत सासणे यांची 95 व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भारत सासणे यांची 95 व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड

लातूर : उदगीरमध्ये होणार्‍या 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कथाकार आणि लेखक भारत सासणे यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याची

सत्तेचा दुष्काळ हटविण्यासाठी शंखनाद!
कावड यात्रेत तलवार फिरवल्याने शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल
इंदापुरमध्ये अफूची सात टन अफूची बोंडे जप्त

लातूर : उदगीरमध्ये होणार्‍या 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कथाकार आणि लेखक भारत सासणे यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याची माहिती साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी दिली.
नाशिकमध्ये गेल्याच महिन्यात 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी खगोलतज्ज्ञ जयंत नारळीकर होते. नाशिकमध्ये होणारे साहित्य संमेलन अनेक वादविवादांनी गाजले. मग त्या साहित्य संमेलनाच्या तारखा असो की, साहित्य संमेलनाचे बदललेले स्थळ. आता 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपद निवडीसाठी रविवारी उदगीरमध्ये बैठक झाली. या बैठकीत ज्येष्ठ कथाकार भारत सासणे यांची अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. ठाले-पाटील म्हणाले की, सध्या अध्यक्षाचे नाव घोषित केले आहे. थोड्यात वेळात अजून एक बैठक घेऊन तारखांची घोषणा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षपदासाठी लेखक भास्कर चंदनशिव, अनिल अवचट, बाबा भांड, अच्युत गोडबोले आणि डॉ. रामचंद्र देखणे यांचीही नावे चर्चेत होती. भारत जगन्नाथ सासणे यांचा जन्म 27 मार्च 1951 रोजी जालना येथे झाला आहे. त्यांनी अहमदनगर महाविद्यालयातून बी.एस्सी.ची पदवी घेतली. विविध शासकीय अधिकारी पदांवर त्यांनी काम केली. 1980 नंतरच्या आधुनिक मराठी कथाकारांमध्ये सासणे हे एक अग्रगण्य व महत्त्वाचे कथालेखक आहेत. नव कथेची सारी वैशिष्ट्ये आत्मसात करून त्यातून आपला वेगळा, स्वतंत्र बाज निर्माण करणारी कथा सासणे यांनी लिहिली. त्यांच्या कथांतून ग्रामीण, आदिवासी, नागर असे समाजजीवनाचे विविध स्तर व त्या सामाजिक परिसरात जगणारी, वैशिष्ट्यपूर्ण स्वभावधर्म असणारी नानाविध माणसे भेटतात. मानवी जीवनाची अतर्क्यता व असंगतता, मानवी नातेसंबंधांतील ताणतणाव, व्यक्तीच्या मनोविश्‍वातील गूढ, व्यामिश्र व अनाकलनीय गुंतागुंत, त्यांचे सूक्ष्म, अनेक पदरी चित्रण करणार्‍या त्यांच्या कथा स्वाभाविकपणेच दीर्घत्वाकडे झुकतात.

निवड झाल्याने मनस्वी आनंद ः भारत सासणे
सासणे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने मनस्वी आनंद झाला आहे. घुमान येथे 2015 मध्ये झालेल्या संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली होती. आता सन्मानाने निवड झाल्याबद्दल आनंदी आहे. डिसेंबर महिन्यात नाशिक येथे 94 वे साहित्य संमेलन पार पडले होते. त्या संमेलनाच्या समारोपप्रसंगी चार महिन्याच्या आत पुढील साहित्य संमेलन होणार असल्याची माहिती देण्यात आली होती. त्या अनुषंगाने महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या महाराष्ट्र उदयागिरी महाविद्यालयाने संमेलन घेण्याची तयारी सुरू केली आहे.

COMMENTS