Homeताज्या बातम्या

वाशिम जिल्ह्यात धक्कादायक घटना; सैन्यातील जवानाकडून ७ महिन्यांच्या गर्भवती पत्नीची हत्या

वाशिम : वाशिम जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. सैन्यदलात असणाऱ्या लष्कर जवानाने आपल्या 7 महिन्यांच्या गर्भवती पत्नीची हत्या केली घटना समोर आ

NEET पेपरफुटी आंदोलन हिंसाचार प्रकरण: तेज प्रताप यादव यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
आष्टी पोलिसांची धडक कारवाई; २४३ गुन्ह्यांतील ७.८४ लाखांचा अवैध दारूसाठा नष्ट!
शेतकऱ्यास मारहाण; कुंभेफळ ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंचासह सहा जणांवर गुन्हा दाखल
सेना के जवान ने 7 माह की गर्भवती पत्नी को उतारा मौत के घाट, दूसरी महिला से  थे प्रेम संबंध; माता-पिता सहित गिरफ्तार - India TV Hindi

वाशिम : वाशिम जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. सैन्यदलात असणाऱ्या लष्कर जवानाने आपल्या 7 महिन्यांच्या गर्भवती पत्नीची हत्या केली घटना समोर आली आहे. या घटनेनं वाशिम जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मृत महिलेच्या भावाच्या फिर्यादीवरून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पतीसह सासु सासऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

कारंजामधील शिवनगर येथे भारतीय सैन्यात कार्यरत असलेल्या लष्कर जवानाने आपल्या सात महिन्याची गर्भवती असलेल्या पत्नीची हत्या केल्याची घटना घडली आहे. यामुळं वाशिम जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मृत महिलेच्या भावाच्या फिर्यादीवरुन या प्रकरणी खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सैन्याच्या 6 व्या मराठा बटालियनमध्ये कार्यरत असलेला 28 वर्षीय पती ज्ञानेश्वर मदने आणि त्याच्या आईवडिलांना पोलिसांनी अटक केली आहे. महिलेच्या भावाने दिलेल्या फिर्यादी नुसार, काल दुपारच्या दरम्यान ज्ञानेश्वर मदने यांनी फोन कॉलद्वारे माहिती देत सांगितले की, मृत दिपाली घरातील काम करत असताना पडल्यानं तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मृत महिला दीपालीचा भाऊ आणि आईवडीलांना माहिती मिळताच मध्यप्रदेशच्या बुऱ्हाणपूर येथून कारंजा इथं आले तेव्हा दीपाली त्यांना मृत अवस्थेत आढळून आली. महिलेचा भाऊ राहुल माने यानं आरोप करत सांगितले की, ज्ञानेश्वर मदने याचे दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध होते, त्यामुळं तो दीपालीचा छळ करत होता. काही महिन्यांपूर्वी या प्रकरणी दोन्ही कुटुंबांमध्ये समझोता बैठक झाली होती. परस्पर सामंजस्यानं हे प्रकरण मिटवण्यात आलं होतं. मात्र, अखेर दीपालीची हत्या करुन सासरी मंडळीने पिच्छा सोडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत दीपालीच्या गळ्यावर असलेल्या खुणा बघून त्यांना संशय आल्यानं हत्याच केल्याचं कळते, त्या वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

COMMENTS