मुंबईला बॉम्बने उडवण्याची पुन्हा धमकी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईला बॉम्बने उडवण्याची पुन्हा धमकी

सोमालियातून मेसेज आल्यामुळे खळबळ

मुंबई/प्रतिनिधी :काही दिवसांपूर्वीच मुंबईला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्यानंतर खळबळ उडाली होती. तसेच रायगडच्या हरिहरेश्‍वर समुद्रकिनार्‍या

800 कर्जदार शेतक-यांची माहितीच जुळेना
10 वर्षाच्या आरवने केली धरमतर खाडी पार
ठसठसणारे मणिपूर आणि प्रश्न ! 

मुंबई/प्रतिनिधी :काही दिवसांपूर्वीच मुंबईला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्यानंतर खळबळ उडाली होती. तसेच रायगडच्या हरिहरेश्‍वर समुद्रकिनार्‍यावर आढळलेल्या बोटीत एके-47 सह मोठया प्रमाणावर शस्त्रास्त्र आढळून आल्यामुळे दहशतवादी संघटनांचा हल्ल्याचा कट तर नाही ना, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यानंतर शुक्रवारी मुंबई वाहतूक नियंत्रण कक्षाला पुन्हा धमकीचा व्हॉट्सअ‍ॅप मेसेज आला आहे. ’ज्या प्रकारे सोमालियात नुकतीच दहशतवादी घटना घडली आणि ज्या प्रकारे मुंबईत 26/11 चा हल्ला झाला. त्याच पद्धतीने पुन्हा हल्ला करू शकतो. म्हणून सावध रहा’, असा इशारा या मेसेजमध्ये देण्यात आला आहे.
वाहतूक अधिकार्‍यांनी याबाबत सांगितले की, हा संदेश सोमालियाच्या क्रमांकावरून आला आहे. हा अलर्ट मेसेज आहे. सोमालियाच्या नंबरवरून हा मेसेज आला आहे. तो कोणी पाठवला याचा तपास सुरू आहे.2 दिवसांपूर्वीच मुंबई वाहतूक नियंत्रण कक्षाला व्हॉट्सअ‍ॅपद्वारे धमकीचा संदेश आला होता. त्यात 26/11 सारख्या अतिरेकी हल्ल्याची धमकी देण्यात आली होती. गुन्हे शाखेच्या अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, ज्या क्रमांकावरून हा संदेश आला तो पाकिस्तानचा होता. मात्र, ज्या आय .पी. अड्रेसचा वापर करून हा मेसेज पाठवण्यात आला, तो इतर देशाचा आहे. हे प्रकरण ताजे असतानाच आता पुन्हा वाहतूक नियंत्रण कक्षाला धमकीचा मेसेज आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपासाला सुरूवात केली आहे. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील समुद्रकिनारी आठवडाभरापुर्वीच 2 बोट संशयास्पदरित्या आढळल्याने खळबळ उडाली होती. एका बोटीत एके-47 रायफल्स व स्फोटके सापडले आहेत. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सांगितले होते की, ऑस्टेलियन महिलेची ही बोट असून भरसमुद्रात बंद पडल्याने ती भरकटत रायगड किनारी आली होती. राज्य तपास यंत्रणांना याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले असून अलर्टवर राहण्यास सांगितले आहे.

COMMENTS