नांदेड : राज्यामध्ये लाडकी बहीण योजना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणली. त्यामुळे बहिणीला कायमची ओवाळणी या योजनेच्या माध्यमातून मिळाली. माझ्य

नांदेड : राज्यामध्ये लाडकी बहीण योजना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणली. त्यामुळे बहिणीला कायमची ओवाळणी या योजनेच्या माध्यमातून मिळाली. माझ्यासारख्या सर्वसामान्य महिलेला राज्यसभा खासदार बनविले, ही किमया शिवसेनेची आहे. आ. बालाजी कल्याणकर यांच्या सुविद्य पत्नी सौ. संध्याताई कल्याणकर यांनी एकवीस हजार महिलांना स्वावलंबी बनविले. ही बाब कौतुकास्पद असून महिलांच्या सक्षमीकरणासाठी शिवसेना कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन शिवसेनेच्या राज्यसभा सदस्या डॉ. ज्योतीताई वाघमारे यांनी केले.
संध्याताई फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित जागतिक महिला दिन सप्ताहनिमित्त नांदेड येथील गोकुळ लॉन्स मालेगाव रोड येथे दि.28 मार्च रोजी नवरत्न महिला सन्मान पुरस्कार सोहळा पार पडला, यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला व्यासपीठावर प्रमुख वक्त्या म्हणून खा. डॉ. ज्योतीताई वाघमारे, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. रूपालीताई सवणे परतूरकर, गोविंद गुरु महाराज,नांदेड उत्तरचे आ.बालाजी कल्याणकर,शिवालय उद्योग समुहाच्या अध्यक्षा संध्याताई बालाजी कल्याणकर, जिल्हाप्रमुख गंगाधर बडुरे, सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष नारायण कदम, सोलापूरचे नगरसेवक प्रियदर्शन साठे, सहसंपर्कप्रमुख दर्शनसिंघ सिद्धू, संतोष भारसावडे, शिवाजीराव कल्याणकर, महिला जिल्हाप्रमुख गीता पुरोहित, वनमाला राठोड, महिला महानगरप्रमुख श्रद्धाताई चव्हाण, नगरसेवक सुहास कल्याणकर, नगरसेवक योगेश मुंडे, दिपा थोरवट, तालुकाप्रमुख गणेश बोकारे, धनंजय पावडे, महिला तालुकाप्रमुख मीनाक्षी सूर्यवंशी, लता शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना खा.डॉ. ज्योतीताई वाघमारे म्हणाल्या की, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लाडके आमदार बालाजी कल्याणकर आहेत. त्यांच्या नावात कल्याणकर असल्यामुळे ते लोकांचे नेहमीच कल्याण करतात. किंबहुना अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवितात. त्यांच्यासोबत त्यांच्या सुविद्य पत्नी संध्याताई कल्याणकर यांचे कार्यही कौतुकास्पद आहे. 21 हजार महिलांना बचतगटाच्या माध्यमातून स्वावलंबी करणे हे फार मोठे कार्य आहे. येथे उल्लेखणीय काम करणार्या महिलांचा पुरस्कार देऊन सन्मान करणे ही बाब महिलांच्या उन्नतीचे पाऊल आहे. शिवसेना नेहमीच महिलांच्या विकासासाठी कटीबद्ध राहील, असेही त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवालय उद्योग समुहाच्या अध्यक्षा संध्याताई बालाजीराव कल्याणकर यांनी सांगितले की, शिवालय प्रतिष्ठानच्या माध्यमातून महिलांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. महिला विविध क्षेत्रात आता काम करू लागल्या आहेत. महिलांनी आपली संस्कृती जपली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. जागतिक महिला दिनानिमित्त नवरत्न महिला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्यात नवरत्न महिला सन्मान पुरस्कार के. सीताराम मोहनराव (सीताभाभी), कावेरीताई नागरगोजे (संचालिका, शांतीवन बीड), अंजली रावते, डॉ. रचिता बिडवई, डॉ. मथुताई सावंत, मनीषा मांजरमकर, पुष्पा सूर्यवंशी, भारतीताई बडुरे, अनुपमा केंद्रे, पूजा फुलारी यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी नांदेड उत्तर मतदार संघातील महिला भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश गिरे पाटील, सतीश कासेवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संध्याताई फाऊंडेशन, शिवालय उद्योग समूह, शिवालय निधी अर्बन बँकेच्या कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.
महिलांनी अंधश्रद्धांना बळी पडू नये
संत तुकाराम महाराज, संत गाडगेबाबा, शिव-फुले-आंबेडकर यांचा वारसा महाराष्ट्राला लाभलेला आहे. महिलांवरील अत्याचार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कदापि सहन करणार नाहीत. अत्याचार करणार्याला कठोर शिक्षा करणार आहोत, परंतु महिलांनी भोंदूबाबांच्या अंधश्रद्धांना बळी पडू नका, असे आवाहन शिवसेनेच्या खा. डॉ. ज्योतीताई वाघमारे यांनी केले.

COMMENTS