Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गॅस टंचाईवर मुक्रमाबादच्या तरुणाची मात; ‘वेस्ट ऑईल’वर चालणारी अनोखी शेगडी तयार

मुक्रमाबाद : सध्याच्या महागाईच्या काळात घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर गगनाला भिडले असून, त्यातच आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे व्यावसायिक

मुक्रमाबाद येथे संत शिरोमणी गोरोबा काका पुण्यतिथी सोहळा उत्साहात संपन्न;ह.भ.प. रंगनाथ महाराज कंधारकर यांच्या कीर्तनाने मुक्रमाबाद नगरी दुमदुमली
मुक्रमाबाद येथे संत शिरोमणी गोरोबा काका पुण्यतिथी सोहळा उत्साहात संपन्न;ह.भ.प. रंगनाथ महाराज कंधारकर यांच्या कीर्तनाने मुक्रमाबाद नगरी दुमदुमली
नांदेड-बिदर राष्ट्रीय महामार्गावर लखमापूरजवळ रस्ता खचला; अपघाताची भीती

मुक्रमाबाद : सध्याच्या महागाईच्या काळात घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर गगनाला भिडले असून, त्यातच आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे व्यावसायिक गॅस पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. यामुळे हॉटेल व्यावसायिकांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. मात्र, या समस्येवर मुक्रमाबाद येथील तरुण व इडली सेंटर चालक गजानन पांचाळ यांनी आपल्या कल्पकतेच्या जोरावर अभिनव उपाय शोधला आहे.
गजानन पांचाळ यांनी टाकाऊ ‘वेस्ट इंजिन ऑईल’वर चालणारी एक अनोखी शेगडी तयार केली असून, या प्रयोगामुळे गॅसवरील खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होत आहे.  गजानन यांनी स्वतःच्या कल्पनेतून विकसित केलेल्या या शेगडीची काही वैशिष्ट्ये लक्षवेधी आहेत: इंधनाचा खर्च अत्यल्प : या शेगडीसाठी गॅस किंवा लाकडाची गरज नसून, गॅरेजमध्ये टाकाऊ म्हणून फेकले जाणारे ‘वेस्ट ऑईल’ इंधन म्हणून वापरले जाते. ब्लोअरचा वापर : प्रखर ज्वाला निर्माण करण्यासाठी छोट्या इलेक्ट्रिक ब्लोअरद्वारे नळीतून हवा पुरवली जाते. जास्त उष्णता क्षमता : ऑईल आणि हवेच्या मिश्रणामुळे गॅसपेक्षाही अधिक तीव्र निळसर-पिवळी ज्वाला तयार होते, ज्यामुळे स्वयंपाक जलद होतो.  70 ते 80 टक्के खर्चात बचत  या संदर्भात गजानन पांचाळ म्हणाले, गॅसचे वाढते दर आणि पुरवठ्यातील अडचणींमुळे हॉटेल चालवणे कठीण झाले होते. अनेकदा सिलिंडर संपल्यामुळे काम ठप्प व्हायचे. त्यामुळे पर्याय शोधताना ही शेगडी तयार केली. आता टाकाऊ ऑईल सहज आणि स्वस्त मिळत असल्याने खर्चात जवळपास 70 ते 80 टक्के बचत होत आहे.  परिसरात चर्चेचा विषय गजानन पांचाळ यांची ही ‘जुगाड’ शेगडी पाहण्यासाठी मुक्रमाबाद परिसरात नागरिकांची गर्दी होत असून, त्यांच्या या कल्पकतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. ग्रामीण भागातील तरुणांनी अशा प्रकारे नवकल्पना केल्यास महागाईसारख्या समस्यांवर प्रभावी उपाय शोधता येऊ शकतात, अशी चर्चा सध्या परिसरात रंगत आहे.

COMMENTS