Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

म्हांडूळा येथील शिवसेनेचे कार्यकर्ते राष्ट्रवादीत

माजी आ.अमरसिंह पंडित यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत केले स्वागत

गेवराई वार्ताहर - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वावर वि

‘बाहुबली’ फेम अभिनेत्री तमन्ना भाटिया लवकरच घेणार सात फेरे;
गावठी हातभट्टी विक्री करणार्‍यांवर कारवाई
आमदार तांबेंनी घेतली शिक्षकांच्या प्रश्‍नांवर बैठक

गेवराई वार्ताहर – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मौजे म्हांडूळा येथील शिवसेनेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत शनिवार दि.13 मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.  यावेळी व्यासपीठावर माजी जि. प. सदस्य डॉ. विजयकुमार घाडगे, पं.स. सदस्य तय्यब भाई शेख, पं. स. सदस्य तथा गटनेते परमेश्वर खरात, लहुराव ढोबळे, कृउबा समितीचे संचालक पांडुरंग मुळे, मुजीब भाई पठाण, हिवरवाडीचे सरपंच फय्युम भाई, मोहनराव टकले, अंबादास सांगळे, दयानंद पांडूळे,  माऊली खरे, भाऊसाहेब घाडगे, शिवाजी गाडे, मच्छिंद्र शेळके, राधाकीसन शेंबडे, शिवाजी महानोर, कानिफ चव्हाण, आबा शेंबडे, पाशु मामा, शिवाजी खेडकर, रहिमतुल्ला पठाण, तौफिक भाई यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेवराई तालुक्यातील म्हांडूळा  येथील शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते माजी उपसरपंच शेख हमिदभाई, माजी उपसरपंच शेख मुजमिल पटेल, शेख बाबू नबी, मेहमूद अजीज पठाण, शेख अजीम रशीद, शेख अन्सर बाबुलाल, शेख जहिर मुनीर, शेख नाजिम जब्बार, शेख रहीम बाबू, शेख तैमूर भाई शेख समीर मुनीर, शेख नाजीम रशीद, शेख मुजमील बाबू, शेख जकी रज्जाक पटेल, शेख मुकिद तैमूर, शेख ताहेर अजीज, शेख वाहेद अजीज, शेख वसीम अय्युब, शेख शाहीद हमीद, धनंजय शिंदे आदींसह असंख्य कार्यकर्त्यांनी माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये म्हांडूळा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. अमरसिंह पंडित यांनी सर्वांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये स्वागत केले. तसेच यावेळी बोलताना अमरसिंह पंडित म्हणाले की, तुमच्या प्रत्येकाच्या अडचणी सांगत चला, मी नक्कीच त्या सोडवेण तसेच तुमच्या छोट्या मोठ्या कामासाठी न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहील, असा शब्दही यावेळी बोलताना त्यांनी दिला. यावेळी सर्जेराव घारगे, शब्बीर भाई, गुलाब नबी, शीमंत शिंदे, विठ्ठल ढोबळे, मच्छिंद्र ढोबळे, जगन्नाथ ढोबळे, महादेव ढोबळे, अंकुश ढोबळे, अशोक ढोबळे, नामदेव ढोबळे, बाबासाहेब घाडगे, काकासाहेब घारगे, नानासाहेब घारगे, आण्णासाहेब घारगे, आत्माराम घाडगे, सुभाष माने, कांता माने, देविदास माने, रुद्रा माने, बळीराम माने, लहु माने, महेमुद शेख, रशिदभाई, कदिर शेख, अहमद शेख, माशुम शेख, दिनकर उघडे, सुनिल उघडे, धर्मा गिरी, शेख हुसेन, शकिल शेख, घाडगे अंजु, अस्लम शेख, शिवाजी ढोबळे, सोमनाथ ढोबळे, बाळू घारगे यांचेसह आदी कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते लहुराव ढोबळे तर आभार गंगाधर घारगे यांनी व्यक्त केले.
मिरगाव येथील गोविंद पगारे,भरत पवार राष्ट्रवादीत दाखल
मिरगाव येथील शिवसेनेचे सक्रीय कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य  गोविंद पगारे, भरत पवार यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. अमरसिंह पंडित यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी सरपंच भिमराव झाकणे सरपंच, चेअरमन बप्पासाहेब पंडित, शिवाजीराव गोडबोले, बाळासाहेब जाधव, कैलास प-हाड, प्रकाश प-हाड, विशाल उमाप, अण्णासाहेब जामकर, अशोक पवार, माजी सरपंच शेख मुजमिल पटेल, माजी उप सरपंच शेख हमिदभाई यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS