Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्ह्यात चार महिन्यात 129 अपघातात 139 जणांचा मृत्यू

बीड प्रतिनिधी - बीड जिल्ह्याती राष्ट्रीय महामार्ग व राज्यमार्गावर अपघातांची संख्या वाढलेली असुन मागील 120 दिवसात 129 अपघात घडले असुन यामध्ये तब्

चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी
समृद्धी महामार्गावरील अपघातात दोघे जखमी
पुण्याहून नांदेडला निघालेल्या बसला अपघात

बीड प्रतिनिधी – बीड जिल्ह्याती राष्ट्रीय महामार्ग व राज्यमार्गावर अपघातांची संख्या वाढलेली असुन मागील 120 दिवसात 129 अपघात घडले असुन यामध्ये तब्बल 139 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघात होण्याचे अतिवेगाने वाहन चालवणे हे जरी प्रमुख कारण असले तरी रस्त्यावर पडलेल्या भेगा,पुलांची अर्धवट रखडलेली व निकृष्ट दर्जाच्या रस्ता कामामुळे अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे.तक्रारीनंतर थातुरमातुर डागडुजी करण्यात येते मात्र महिनाभरानंतर पुन्हा भेगा पडलेल्या दिसुन येतात.  गाव वाड्या, वस्त्या यांना जोडणा-या रस्त्यावरील अपघातांची आकडेवारी चिंताजनक आहे. प्रशासनाकडून रस्ता सुरक्षा अभियान जरी राबविले जात असले तरी ते केवळ कागदावरच रापम, पोलिस प्रशासन आणि आरटीओ विभाग लाखो रुपये खर्च करते मात्र जनजागृतीच्या नावाखाली केवळ फोटोसेशन केले जाते.त्यामुळे सामान्य वाहनधारकांमध्ये अजुनही पुरेशी जनजागृती झालेली दिसुन येत नाही.वरील प्रकारे राबवल्या जात असणा-या रस्ता सुरक्षा अभियानाचा फायदा दिसून येत नाही.अपघात रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवणे गरजेचे आहे.

COMMENTS