शेतकरी नेते टिकैत यांच्यावर हल्ला

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकरी नेते टिकैत यांच्यावर हल्ला

केंद्र सरकारकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे नेते राकेश टिकैत यांच्यावर शुक्रवारी राजस्थात जीवघेणा हल्ला करण्यात आला.

मुलांना चांगले आणि विविध क्षेत्रातील शिक्षण देणे गरजेचे – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर
शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे 10 दिवसांत काढण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आदेश
नवऱ्यानं भररस्त्यात बायकोला विवस्त्र करुन बेदम मारलं | LOKNews24

जयपूरः केंद्र सरकारकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे नेते राकेश टिकैत यांच्यावर शुक्रवारी राजस्थात जीवघेणा हल्ला करण्यात आला. 

अलवरच्या हरसौरा भागातील एका सभेला संबोधित केल्यानंतर टिकैत बानसूरकडे निघाले होते. त्याचवेळी ततारपूर भागात त्यांच्या गाडीवर काही अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत टिकैत यांच्या गाडीच्या काचा फुटल्या. तसेच काही अज्ञातांनी टिकैत यांच्या अंगावर शाई फेकली; मात्र पोलिसांनी वेळीच परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आणि टिकैत यांच्या सुरक्षित बाहेर काढले. पोलिस सुरक्षेतच टिकैत यांना बानसूरला पोहचवण्यात आले. हा हल्ला भाजपच्या गुंडांकडून करण्यात आल्याचा आरोप टिकैत यांनी केला. हा लोकशाहीच्या हत्येचा प्रयत्न असल्याचेही टिकैत यांनी म्हटले. बानसूर भागात टिकैत यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले. शेतकरी नेत्यांनी ‘ईंट का जवाब पत्थर से देंगे’ असे म्हणत हा हल्ला भाजपकडून करण्यात आल्याचा आरोप केला. भारतीय किसान युनियनचे हरयाणाचे युवा प्रदेश अध्यक्ष रवी आझाद यांची अटक सहन केली जाणार नाही. सरकारने रवी आझाद यांची त्वरीत सुटका करावी; अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा टिकैत यांनी दिला.

COMMENTS